Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अभिजित पाटलांनी केलेली ऊसदराची कोंडी परिचारकांनी फोडली; ‘पांडुरंग’ देणार २७०० ते २८०० चा दर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

अभिजित पाटलांनी केलेली ऊसदराची कोंडी परिचारकांनी फोडली; ‘पांडुरंग’ देणार २७०० ते २८०० चा दर

Surajya Digital
Last updated: 2022/10/02 at 12:52 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

□ स्पर्धेच्या दरात शेतकऱ्यांना फायदा

पंढरपूर :कारखाना चालवणारा माणूस म्हणून अभिजित पाटील यांची ओळख झालीय. अभिजित पाटील यांनी २५०० रुपये दर जाहीर करून कारखानदारांची कोंडी केली. ही कोंडी माजी आमदार प्रशांत परिचारकांनी फोडली. Abhijit Patel’s sugar dilemma was broken by attendants; ‘Pandurang’ will give rate of 2700 to 2800 Solapur Pandharpur

 

अभिजित पाटील यांनी विठ्ठलच्या निवडणुकीत येणाऱ्या ऊस हंगामात २५०० रुपये दर जाहीर करून कारखानदारांची कोंडी केली होती. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडली आहे. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक साखर कारखाना २७०० ते २८०० रुपये दर येणाऱ्या सीजनमध्ये देणार असल्याची घोषणा माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली.

 

साखर कारखानदारांत ऊस दराची स्पर्धा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराच्यादरम्यान विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सभासदांना २५०० रुपये भाव देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे इतर कारखानदारांची मोठी कोंडी झाली होती. कोट्यावधी रुपयाचे कर्ज असणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना जर पंचवीसशे रुपये दर देत असेल तर विठ्ठल पेक्षा कमी कर्ज असलेल्या कारखान्याने किती द्यावा? हा प्रश्न निर्माण झाला होता.

 

Contents
□ स्पर्धेच्या दरात शेतकऱ्यांना फायदास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ स्पर्धेच्या दरात शेतकऱ्यांना फायदा

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

विठ्ठलच्या निवडणुकीत २५०० रुपये दर जाहीर केल्यानंतर पंढरपूरच्या आसपासच्या सर्वच साखर कारखानदारांनी अभिजित पाटील यांची कोंडीही केली होती. पाटील यांची विठ्ठलवर सत्ता आली तर आपल्या देखील साखर कारखान्यांना विठ्ठलच्या बरोबरीने उसाला दर द्यावा लागेल, त्या भीतीने पाटलांना साखर कारखानदारांनी असताना कडाडून विरोध केला होता. त्यांचे पॅनल पराभूत करण्यासाठी सर्व कारखान्याचे कारखानदारांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती.

विठ्ठल कारखाना कर्जात असताना दोन वर्षा मागील शेतकऱ्यांच्या उसाचे बिल बिल हे अभिजित पाटील यांनी दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल मोठा विश्वास निर्माण झाला आहे. असे कर्मवीर सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी येणाऱ्या हंगामात आपल्या सभासदांसाठी २७०० ते २८०० रुपये दर देण्याचे जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

□ स्पर्धेच्या दरात शेतकऱ्यांना फायदा

 

विठ्ठल आणि पांडुरंग कारखान्यामध्ये दराची स्पर्धा ही जुनीच आहे. विठ्ठलने २५०० रुपये भाव जाहीर केल्यामुळे पांडुरंग कारखान्याचा सुद्धा आपल्या शेतकऱ्यांना जादा दर मिळणार आहे. या स्पर्धेचा फायदा हा शेतकऱ्यांना होणारा आहे. येणाऱ्या काळात ऊस दराची स्पर्धा निर्माण झाल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #AbhijitPatil #sugar #dilemma #broken #byattendants #Pandurang #giverate #Solapur #Pandharpur, #अभिजितपाटील #ऊसदर #कोंडी #प्रशांतपरिचारक #फोडली #पांडुरंग #दर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अक्कलकोट । महात्मा गांधीजींच्या जीवनप्रवासातील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन
Next Article आनंददादा…कोणता झेंडा घेऊ हाती ?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?