Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूरचे सुपुत्र अतुल कुलकर्णींनी लिहिली आमिरच्या ‘लाल सिंग चड्डा’ची स्क्रिप्ट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडमहाराष्ट्र

सोलापूरचे सुपुत्र अतुल कुलकर्णींनी लिहिली आमिरच्या ‘लाल सिंग चड्डा’ची स्क्रिप्ट

Surajya Digital
Last updated: 2022/08/07 at 4:16 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

□ कथा लिहिली 15 दिवसात पण वाचायला अमिरने लावली दोन वर्षे

पुणे : आमिर खानचा लाल सिंग चड्डा नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे प्रमोशनही जोरात सुरू आहे. बॉलीवूडचा लाल सिंग चड्ढा चित्रपट हा ऑस्कर विजेत्या फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाची कथा ही सोलापूर सुपूत्र प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे. Atul Kulkarni, son of Solapur, wrote the script of Aamir’s ‘Lal Singh Chadha’

Contents
□ कथा लिहिली 15 दिवसात पण वाचायला अमिरने लावली दोन वर्षेस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ आमिरच्या लाल सिंग चढावर 3 राज्यात बंदी, KRK चा दावा

अतुल कुलकर्णीने सांगितले की फॉरेस्ट गंपचे रूपांतर २००८ मध्ये आमिर खानच्या प्रॉडक्शनच्या जाने तू या जाने ना’ या चित्रपटाच्या प्रीमियरनंतर सुरू झाले. या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी आम्ही सर्वजण आमिर खानसोबत गेलो होतो. त्याचवेळी आवडत्या चित्रपटाच्या विषयावर चर्चा सुरू झाली.

अतुल कुलकर्णी पुढे म्हणाले की मी आणि आमिरने फॉरेस्ट गंपचे नाव घेतले. यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्याच चित्रपटाची DVD पाहिली. माझ्याकडे मोकळा वेळ असल्याने मी हा चित्रपट पाहिला. या वेळी मला वाटले की जर चित्रपटात दाखवलेले सर्व काही भारतात असेल तर त्याचा काय परिणाम होईल. चित्रपट पाहताना मला वाटले की त्याच्या स्क्रिप्टवर काम का करू नये.

 

अतुल कुलकर्णी पुढे सांगतात की, मी १० दिवसांत स्क्रिप्ट पूर्ण केली. पण खरी मेहनत सुरू व्हायची होती. स्क्रिप्ट घेऊन तो आमिरकडे घेऊन गेला. आमिरने त्याला स्क्रिप्ट वाचण्यासाठी वेळ दिला नाही. अतुल कुलकर्णीने सांगितले की, आमिर खानने पहिली दोन वर्षे स्क्रिप्टही वाचली नाही. दोन्ही कलाकार एकमेकांच्या संपर्कातही होते. आमिर नेहमी म्हणायचा हो, वाचूयात.’

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

काही वर्षांनंतर अतुल कुलकर्णीने अभिनेता आमिर खानला विचारले की तो स्क्रिप्ट कधी वाचणार. यानंतर आमिर अतुलला म्हणाला- तू लेखक नाहीस आणि तू मला सांगतो की तू १५ दिवसांत फॉरेस्ट गंपची स्क्रिप्ट लिहिली आहेस. तू माझा जवळचा मित्र आहेस आणि तू खूप वाईट लिहिलं आहेस असं सांगून मी तुला निराश करू इच्छित नाही.’ म्हणून मी स्क्रिप्ट ऐकत नव्हतो. मात्र, अतुलने आमिरला हे सांगून स्क्रिप्ट वाचायला लावली की वाचल्यानंतर त्याला आवडली नाही तर त्याने फेकून दिली तरी चालेल.

 

अतुल कुलकर्णी म्हणाले, “तू कथा वाचून फेकून दिलीस तरी चालेल. असे म्हणत मी आमिरला ती कथा वाचण्यास भाग पाडले. त्यानंतर आमिरला कथा इतकी आवडली की त्याने केवळ अभिनयच नव्हे तर चित्रपटाची निर्मिती देखील करण्याचा निर्णय घेतला.” पण त्यांनतर पुढील काही वर्षे पॅरामाउंट पिक्चर्सकडून ‘फॉरेस्ट गंप’चे राईट्स मिळवण्यात गेले. मूळ राईट्ससाठी पॅरामाउंटशीही संपर्क साधण्यास सुरुवात केली आणि त्यासाठी १० वर्षे लागली.” यासाठी खरोखर खूप वेळ लागल्याचे त्यांनी सांगितले.

 

आता अद्वैत चंदन दिग्दर्शित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट येत्या ११ ऑगस्ट २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील आमिर खानच्या लूकची विशेष चर्चा होत आहे. या चित्रपटात करीना कपूर खान आणि मोना सिंग यांच्याही भूमिका आहेत. दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

 

□ आमिरच्या लाल सिंग चढावर 3 राज्यात बंदी, KRK चा दावा

 

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘बॉयकॉट लाल सिंह चड्ढा’ हा ट्रेंड चर्चेत आहे. त्यामुळे प्रदर्शनाआधीच हा चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे.

 

अभिनेता आमिर खानला हिंदुत्वविरोधी ठरवत त्याचा चित्रपट ‘लाल सिंग चढ्ढा’ला बॉयकॉट करण्याचे आवाहन होत आहे. अशातच अभिनेता कमाल आर खानने एक दावा केला आहे. लाल सिंग चढावर तीन राज्यांमध्ये बंदी घालण्यात आल्याचा दावा केला. केआरके त्या ट्विटमध्ये म्हणतो की, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा यांच्यासहित आणखी काही राज्यांमध्ये लाल चड्ढा सिंगवर बंदी घालण्यात आली आहे.

 

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #AtulKulkarni #son #Solapur #wrote #script #Aamirkhan #LalSinghChadha #bollywood, #सोलापूर #सुपुत्र #अतुलकुलकर्णी #लिहिली #आमिरखान #लालसिंगचड्डा #स्क्रिप्ट
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर : शोषखड्ड्यात पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Next Article सोलापूर : कॅनलमध्ये पडल्याने तरुण दुचाकी चालकाचा मृत्यू

Latest News

उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
हिमाचल प्रदेशमध्ये प्रवाशांनी भरलेली बस उलटली; ४४ प्रवासी जखमी
Top News July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?