Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: केंद्राकडून आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण खात्याच्या कामांचं ऑडिट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

केंद्राकडून आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण खात्याच्या कामांचं ऑडिट

Surajya Digital
Last updated: 2022/07/25 at 9:11 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ आदित्य ठाकरेंनी उभारलेला ‘तो’ पूल गेला वाहून

मुंबई : राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर आता केंद्र सरकारकडून मागील ठाकरे सरकारच्या अडीच वर्षाच्या कामांचे ऑडिट केले जाणार आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण खात्याचा आढावा केंद्र सरकारकडून घेण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात राजकीय संघर्ष सुरू असतानाच ही महत्त्वाची माहिती समोर आलीय. Maharashtra Pollution Board Audit of Aditya Thackeray’s Environment Ministry from the Centrel government 

 

शिवसेना ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाबरोबरच शिवसेनेचा वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंतही पोहोचला आहे. बंडखोरी केल्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आधी निष्ठा यात्रा आणि त्यानंतर शिव संवाद यात्रा सुरु केली आहे. आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून बंडखोर आमदारांविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यात आता हा ऑडिटचा निर्णय आला आहे. आता केंद्राने ऑडिट सुरू केल्यानं याचे वेगवेगळे राजकीय अर्थ लावले जाऊ लागले आहेत.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

केंद्राकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर विशेष भर देण्यात आला आहे. दरम्यान, ठाकरे आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांचं केंद्र सरकारकडून ऑडिट केलं जाणार आहे. यात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाशी संबंधित कामं ऑडिटच्या केंद्रस्थानी असणार आहेत.

 

महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाच्या कारभाराबाबत केंद्राने मुंबईतील मुख्यालयापासून पुणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड आदी विभागांतील कार्यालयात केंद्र सरकारने ऑडिट सुरू केलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मुख्यालयाबरोबर नागपूर कार्यालयाचा समावेश आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर विभागीय कार्यालयांचंही ऑडिट करण्याबाबत खातेप्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

 

□ आदित्य ठाकरेंनी उभारलेला ‘तो’ पूल गेला वाहून

#नाशिक #nashiknews #AadityaThackeray #rain #bridge #पूल

नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे लोखंडी पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेंद्रीपाडा येथे हा पूल उभारण्यात आला होता. परंतु, आता हा पूलच वाहून गेल्याने नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. विशेष म्हणजे तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने हा पूल उभारण्यात आला होता. या पूलाच्या उद्घाटनासाठी ते स्वतः तिथे गेले होते.

 

You Might Also Like

भंडाऱ्यात लुटणाऱ्या चौघांना अटक

गोंदियात इलेक्ट्रिक खांबावरील अॅल्युमिनियम तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद, ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद

कार्यकर्त्यांनी ग्राऊंडवर उतरून काम करावे – चंद्रकांत पाटील

नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेत श्रद्धा चरखचे यश

TAGGED: #Maharashtra #Pollution #Board #Audit #AdityaThackeray's #Environment #Ministry #Centrel #government, #केंद्रसरकार #आदित्यठाकरे #पर्यावरण #खाते #कामांचं #ऑडिट #महाराष्ट्र #प्रदूषण #मंडळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखांना तूर्तास दिलासा; गुरूवारी पुढील सुनावणी
Next Article सोलापूर जिल्ह्यात मतदान ओळखपत्रास आधार जोडणी मोहीम

Latest News

भंडाऱ्यात लुटणाऱ्या चौघांना अटक
महाराष्ट्र May 30, 2025
गोंदियात इलेक्ट्रिक खांबावरील अॅल्युमिनियम तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद, ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र May 30, 2025
नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान
देश - विदेश May 30, 2025
राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद
महाराष्ट्र May 30, 2025
पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर
देश - विदेश May 30, 2025
पंढरपूरच्या ‘आषाढी’वर कोरोनाचे सावट
देश - विदेश May 30, 2025
दोन शहीद भारतीय जवानांचा संयुक्त राष्ट्रांकडून सन्मान
देश - विदेश May 30, 2025
कार्यकर्त्यांनी ग्राऊंडवर उतरून काम करावे – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र May 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?