Author: admin

  • बेकायदा गर्भपात प्रकरणी आरोपीस उच्च न्यायालयात जामीन मंजूर:- ॲड.जयदीप माने

    बेकायदा गर्भपात प्रकरणी आरोपीस उच्च न्यायालयात जामीन मंजूर:- ॲड.जयदीप माने

    बार्शी : गर्भपात करण्यास कोणत्याही नियमांचे पालन न करता व त्यासाठी कोणतीही वैद्यकीय पात्रता नसताना महिलांचे प्रसूतीपूर्व बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी अटकेत असलेली आरोपी सुषमा गायकवाड हिच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांचे समोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपी सुषमा गायकवाड ची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
    या प्रकरणाची हकीकत अशी की, बार्शी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे बेकायदा गर्भपात होत असलेल्या ठिकाणी छापा टाकून आरोपींना घटनास्थळावरून अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. बार्शी पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोप पत्रक दाखल केले होते. या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुषमा किशोर गायकवाड हिचा जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्या निकाला विरुद्ध आरोपी सुषमा गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या समोर झाली. सदर जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी आरोपी सुषमा गायकवाड ची जामनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

    या प्रकरणी आरोपीतर्फे ॲड. मनोज मोहिते, ॲड. जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲड. पंकज देवकर यांनी काम पाहिले.

  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीने बांधल्या पोलीस बांधव व अग्निशामक दल अधिकारी कर्मचाऱ्यांना राख्या….

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीने बांधल्या पोलीस बांधव व अग्निशामक दल अधिकारी कर्मचाऱ्यांना राख्या….

     

    सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील जी तटकरे साहेब यांच्या आदेशान्वये तसेच महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर , सोलापूर निरीक्षक दिपाली पांढरे मार्गदर्शनानुसार तसेच जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या नेतृत्वात राखी पौर्णिमेनिमित्त शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या वतीने फौजदार चावडी पोलीस ठाणे येथील अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशमन विभाग येथील अधिकारी व कर्मचारी यांना रक्षाबंधन निमित्त राख्या बांधून औक्षण करून रक्षाबंधन निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
    याप्रसंगी महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, युवती अध्यक्ष किरण माशाळकर , प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी सायरा शेख , महिला आघाडी प्रदेश सचिव लता ढेरे , फौजदार चावडी पोलीस ठाण्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे , वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख,पोलीस कर्मचारी रुपनर , हसापुरे, कर्चे, गायकवाड, कसबे महिला आघाडी मधील शोभा गायकवाड, सरोजिनी जाधव सुरेखा घाडगे, लक्ष्मी पवार मीना जाधव उपस्थित होते.
    या स्तुत्य उपक्रमाच फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिलीप शिंदे यांनी विशेष कौतुक करत हा आदर्श प्रत्येक राजकीय पक्षाने सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन करावा यातून समाज प्रबोधन होते असं मत व्यक्त केले.
    तर महिला आघाडी शहराध्यक्ष संगीता जोगधनकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांनी केले.

  • पंतांना अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला

    पंतांना अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला

    पंढरपूर प्रतिनिधी:- स्वर्गीय श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त आज वाखरी येथील श्री सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वाखरी येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक स्मृतीस्थळ वाखरी  येथे भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातून  आणि पंढरपूर शहरातून  जनसागर लोटलेले चित्र पहावयास मिळाले मालकांना अभिवादन करण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून जनसागर आज एकवटला होता .
      पंढरपूर  मतदार संघाचे सतत 25 वर्ष नेतृत्व केलेले एसटी महामंडळाचे मा. अध्यक्ष  स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    पुण्यतिथीनिमित्त कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक  स्मृतीस्थळ वाखरी येथे भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणावर रक्तदानाने रक्तदान केले या कार्यक्रमाप्रसंगी सकाळी आदरांजली  पर मनोगते मान्यवरांनी व्यक्त केली याप्रसंगी नामवंत कीर्तनकार ह. भ. प. जगताप महाराज यांचे प्रबोधनकार कीर्तन पार पडले. दुपारी १२:३० ला पुष्पांजली अर्पण करून आदरणीय मालकांना विनम्र अभिवादन करण्यात आले .  यानंतर सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
  • सकल मराठा समाज बांधव यांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना निवेदन !

    सकल मराठा समाज बांधव यांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना निवेदन !

    वेळापूर प्रतिनिधी
     तांदुळवाडी तालुका माळशिरस येथे माढा खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे आले असता त्यांच्या हस्ते संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नावाचा चौकाचा फलक याचे उद्घाटन करण्यात आले व त्यांना सकल मराठा समाज बांधव तांदुळवाडी यांच्यावतीने मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून  ५० टक्केच्या आत आरक्षण मिळावे याबाबत  आरक्षणासंदर्भात मागण्याचे  निवेदन देण्यात आले. यावेळी सकल समाज मराठा बांधव उपस्थित होते.
  • शेलगाव (क) येथील ग्रामदैवत नागनाथ महाराजांची आज यात्रा

    शेलगाव (क) येथील ग्रामदैवत नागनाथ महाराजांची आज यात्रा

    करमाळा, प्रतिनिधी – श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी भरणाऱ्या तालुक्यातील शेलगाव (क) चे ग्रामदैवत नागनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे याही वर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले आहे. यात्रेनिमित्त किर्तन, पालखी सोहळा, प्रबोधन रुपी भारुड, महाप्रसाद अशा धार्मिक उपक्रमांसह रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले आहे.
    यात्रेच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी रात्री कीर्तन सोहळा झाल्यानंतर आज सोमवारी सकाळी ८ते१० या वेळेत गावातून नागनाथ महाराजांची पालखी काढण्यात येणार आहे. यानंतर १० ते २ या वेळेत राज्यभरातून आलेल्या नामांकित प्रबोधनकार / भारूडकार यांच्या भारुडांचा कार्यक्रम होणार आहे. या भारुडाच्या कार्यक्रमातून मनोरंजनातून प्रबोधन करण्यात येते. भारुडाचा कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी २ नंतर महाप्रसाद होईल. रात्री ९ वाजता नागनाथ महाराजांची छबिना मिरवणूक काढली जाईल. यात्रेदरम्यान सामाजिक बांधिलकी म्हणून गावातील युवकांकडून रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याचे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.
              शेलगाव (क) चे ग्रामदैवत नागनाथ महाराज हे जागृत देवस्थान मानले जाते. पंचक्रोशीतील सौंदे, वरकटणे, देवळाली, अर्जुननगर, फिसरे आदी गावांतील भाविक मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी होतात. तालुक्यातील नागरिकांनी या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
  • शंभूराजे जगताप यांच्या नेतृत्वात ३८ सेकंदामध्ये ४,२७८ वृक्षलागवडीचा विश्वविक्रम…

    शंभूराजे जगताप यांच्या नेतृत्वात ३८ सेकंदामध्ये ४,२७८ वृक्षलागवडीचा विश्वविक्रम…

    करमाळा, प्रतिनिधी – खरेदी विक्री संघांचे चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवक नेते शंभूराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ३८ सेकंदात ४,२७८ वृक्षलागवडीचा विश्वविक्रम शुक्रवार दि. ‌१६ रोजी करण्यात आला. यावेळी एकूण ४,७०० झाडे लावण्यात आली.
    शहरातील मौलाली नगर परिसरात महात्मा गांधी विद्यालयासह शहरातील अनेक शाळांचे विद्यार्थी या वृक्षलागवडीत सहभागी झाले होते. यावेळी सहायक आयुक्त वीणा पवार, मुख्याधिकारी सचिन तपसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर, वनाधिकारी नंदर्गे, ॲड. नवनाथ राखुंडे, संदीप सरडे, शुभम बोराडे, सोमा पठाडे, रेखा परदेशी, ज्योतीराम ढाणे, विक्रम ढाणे, ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलच्या एलिझाबेथ आसादे, स्वराज अकॅडमीचे विद्यार्थी व शिक्षक  तसेच अनिल सुरवसे भाऊसाहेब, इजराइल कुरेशी, रील स्टार दिक्षा शिंदे, साहिल मुलाणी, आफताब मुलाणी, रियाज सय्यद, आकाश सिंधी, गुरू चव्हाण, अतुल देवकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला होता.
  • तिवाडी अन्नपूर्णा नमकीनतर्फे रक्षाबंधन ते दिवाळी भाऊबीजपर्यंत खरेदीवर बक्षिस योजना

    तिवाडी अन्नपूर्णा नमकीनतर्फे रक्षाबंधन ते दिवाळी भाऊबीजपर्यंत खरेदीवर बक्षिस योजना

    सोलापूर : गेल्या 43 वर्षापासून सोलापूर व पुण्यात मिठाई उत्पादन क्षेत्रात नावलौकिक असलेल्या तिवाडी अन्नपूर्णा नमकीन च्या वतीने रक्षाबंधन ते दिवाळी भाऊबीज पर्यंत खरेदीवर बक्षिसांची आकर्षक योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये लकी ड्रॉ द्वारे दुबई टूर, सोन्या – चांदीचे नाणे मिळवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे, अशी माहिती उत्पादक उद्योजक नंदकिशोर तिवाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
              प्रसिद्ध मिठाई उत्पादक व विक्रेते नंदकिशोर तिवाडी हे गेल्या 43 वर्षापासून सोलापुरात तर पुण्यात गेल्या 8 वर्षापासून हा व्यवसाय करीत आहेत. त्यांनी पुण्यातील अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह कारखान्याची उभारणी केली आहे. दरम्यान, तिवाडी अन्नपूर्णा नमकीनच्या वतीने रक्षाबंधन ते दिवाळी भाऊबीज पर्यंत मिठाई खरेदीवर भव्य बक्षीस योजना जाहीर केली आहे. तिवाडी यांच्या अन्नपूर्णा नमकीन मिठाई नावाने असलेल्या मिठाई, नमकीन, बेकरी उत्पादनावर ही बक्षीस योजना आहे.
              50 हजार रुपयाची खरेदी केल्यास एक कुपन मिळेल. यावर दुबई टूरची दोन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. मुंबई टू दुबई, दुबई टू मुंबई असा प्रवास यामध्ये राहणार आहे. एका व्यक्तीसाठी तीन दिवस व दोन रात्र यामध्ये विमान प्रवास हॉटेलमधील निवास व तीन दिवस नाश्ता व एक दिवस जेवण अशी सुविधा उपलब्ध राहणार आहे. 20 हजार रुपयांच्या खरेदीवर एक कुपन मिळेल. 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे अशी 2 बक्षीस आहेत. तर 5 हजार रुपयांच्या खरेदीवर एक कुपन देण्यात येईल. यासाठी 100 बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. यासाठी दहा ग्रॅम वजनांची चांदीची नाणे बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहेत.
              या योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या कुपन मधून साधारणता: 1 डिसेंबर 2024 रोजी लकी ड्रॉ पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे. वेगवेगळ्या बक्षिसांसाठी वेगवेगळ्या लकी ड्रॉ सोडती असतील. योजनेच्या अटी व शर्ती सर्वस्वी तिवाडी अन्नपूर्णा यांच्या असून त्यांनी घेतलेला निर्णय बंधनकारक राहणार आहे. यावर कुठेही तक्रार करता येणार नाही. तेव्हा सर्व ग्राहकांनी या बक्षीस योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नंदकिशोर तिवाडी यांनी केले आहे.
            या पत्रकार परिषदेस सचिन खानापुरे, शैलेश बजाज, संतोष उदगीरी आदी उपस्थित होते.
    ————-
  • सहकारमहर्षी .वि.गु.शिवदारे आण्णा प्रशाला इंगळगी प्रशालेत कै.वि.गु.शिवदारे आण्णा यांची ९८ वी जयंती साजरी

    सहकारमहर्षी .वि.गु.शिवदारे आण्णा प्रशाला इंगळगी प्रशालेत कै.वि.गु.शिवदारे आण्णा यांची ९८ वी जयंती साजरी

    दक्षिण सोलापूर:- सहकारमहर्षी .वि.गु.शिवदारे आण्णा प्रशाला इंगळगी प्रशालेत कै.वि.गु.शिवदारे आण्णा यांची ९८ वी जयंती साजरी करण्यात आली.या जयंती चे औचित्य साधून एम.के.फाऊंडेशन तर्फे स.म.वि.गु.शिवदारे आण्णा प्रशालेत वही वाटप कार्यक्रम कऱण्यात आला.
         प्रशालेत  कै.वि.गु.शिवदारे आण्णा ची ९८ वी जयंती असल्या कारणाने एम.के.फाऊंडेशन चे संस्थापक तथा सागर सिमेंट चे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांनी प्रथमतः कै. वि.गु.शिवदारे च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून अभिवादन केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी माने,प्रमुख पाहुणे महादेव कोगनुरे हे होते.तसेच उपाध्यक्ष इनोंदगी कोटे,सचिव चंद्रकांत गुरव,संचालक यलप्पा कोरे, श्रीशैल देशमुख, विजयकुमार बरबडे,सरपंच विनोद बनसोडे,उपसरपंच प्रतिनिधी प्रधान गुरव, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मौलाली शेख, नूरअहमद बागवान, भीमाशंकर बंदीछोडे, गोरख राऊत,यावेळी मुख्याध्यापक नेल्लुरे,शिक्षक कनोजी,व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी,प्रमुख पाहुणे मा.कोगनुरे साहेबांनी आण्णा चा राजकीय, सहकार,प्रवास विषयी आपले मनोगत व्यक्त केले.आणि विद्यार्थ्याना संबोधित करताना जीवनामध्ये,व शिक्षणा मध्ये मोठ होण्यासाठी स्वप्न बाळगा हा सल्ला त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला.तसेच वह्या वाटप चा कार्यक्रम प्रमूख पाहुणे च्या हस्ते प्रशालेच्या प्रांगणात करण्यात आले.तसेच सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात इ.१० वी ला प्रथम आलेली विद्यार्थिनी कुमारी.वैष्णवी गुरव,द्वितीय विद्यार्थिनी कुमारी.जैतुन शेख,  तृतीय विद्यार्थिनी कुमारी.पायल गाडेकर यांना बक्षीस व प्रमाण पत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे शेवटी अध्यक्षीय भाषण चंद्रकांत गुरव वि.गु.शिवदारे आण्णा विषयी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म्हमाणे ,तर आभारप्रदर्शन श्रीमती वंजारी यांनी मानले.
  • माळशिरस येथे संविधान जागर यात्रेचे जल्लोषात स्वागत

    पिलीव प्रतिनिधी
    संविधान  जागर समिती महाराष्ट्र राज्य  यांच्यावतीने महाराष्ट्र भर संविधान जागर  यात्रा फिरणार असून त्याची सुरुवात ९ ऑगस्ट रोजी महाड येथील चवदार तळ्यापासून सुरुवात झाली.
    गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभर भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार असा अपप्रचार केल्याने अनुसूचित जाती व मागासवर्गीय समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तो दूर करून घटनेमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही व जो अपप्रचार चालू आहे त्याला उत्तर देण्यासाठी संविधान जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही यात्रा महाराष्ट्रभर फिरणार आहे. १६ ऑगस्ट रोजी माळशिरस येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रॅलीचे जंगी स्वागत माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय रामभाऊ सातपुते यांच्या वतीने करण्यात आले.यावेळी नगरसेवक आकाश सावंत, ज्येष्ठ नेते बुवा नाना धाईजे, राजू सावंत, दत्तू सावंत, यशवंत मोहिते सह अनेक समाज बांधव उपस्थित होते.  कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले  वाल्मीक निकाळजे व नितीनजी मोरे यांनी समाजाला प्रबोधन केले.भारतीय घटना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली असून ती बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि भारतीय जनता पार्टी घटना बदलणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर  राजेंद्र गायकवाड व योजनाताई ठोकळे याही उपस्थित होत्या. यावेळी संविधानाच्या प्रतिमेचे पूजन व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून  फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये यात्रेचे स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे  हार व फेटा बांधून स्वागत करण्यात आले.
          या कार्यक्रमाचे प्रस्ताविक  बाळासाहेब सरगर, जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा तथा अध्यक्ष मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना माळशिरस तालुका यांनी केले.
  • मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा संवाद मेळावा हजारो महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न

    मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा संवाद मेळावा हजारो महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न

    अक्कलकोट :- भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा संवाद मेळावा रविवारी वागदरी रस्त्यावरील टिनवाला फंशक्न हाँल येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडवणीस यांनी थेट प्रक्षेपणद्वारे उपस्थित महिलांशी संविद साधले. अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील बहिणींना भेट वस्तु  व मिठाई देऊन सत्कार करण्यात आले.
    दरम्यान आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, माजी नगरसेवक महेश हिंडोळे, मिलन कल्याणशेट्टी, अप्पु बिराजदार, जयशेखर पाटील, शांभवीताई कल्याणशेट्टी, जिल्हा सरचिटणीस सुरेखा होळीकट्टी, लाडकी बहिण योजनेचे अशासकीय सदस्य अमोल हिप्परगी, महेश बिराजदार, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पु परमशेट्टी, महेश पाटील, शंकर भांजी, सलगरचे युवा नेते शिवराज बिराजदार, बसवराज शेळके, नन्नुभाई कोरबु, जकापूर सरपंच लक्ष्मीबाई वंटे, माजी सरपंच दिपाली आळगी, जयश्री बटगेरी, विश्रांती पाटील, सोनाली शिंदे, पुजा राठोड, भागुबाई कुंभार, धनंजय गाढवे, प्रकाश पाटील, बसवराज थंड आदींची प्रमुख उपस्थिती होते.
    या कार्यक्रमात आमदार सचिन कल्याणशेट्टी, शिवानंद पाटील, महेश हिंडोळे, अमोल हिप्परगी, सुरेखा होळीकट्टी आदीनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत महिला सरपंच, उपसरपंच, महिला सदस्य, नगरसेवक, महिला भाजपा पदाधिकारी, महिला आघाडी सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, नेते, माजी नगरसेवक, युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.