Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बार्शी वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. अविनाश जाधव, उपाध्यक्षपदी ॲड. भगवंत पाटील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

बार्शी वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. अविनाश जाधव, उपाध्यक्षपदी ॲड. भगवंत पाटील

Surajya Digital
Last updated: 2021/12/14 at 7:25 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

बार्शी : अत्यंत चुरशीने झालेल्या बार्शी वकिल संघाच्या निवडणुकीत ॲड. अविनाश हौसेराव जाधव हे अध्यक्षपदी तर ॲड. भगवंत शिवाजीराव पाटील उपाध्यक्षपदी व ॲड. नरेंद्र मधुकर घोडके सचिवपदी निवडून आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. विकास जाधव यांनी दिली.

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्ष ही निवडणूक होऊ शकली नव्हती. त्यामुळे या निवडणूकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. अध्यक्षपदासाठी प्रथमच सहा तर उपाध्यक्षपदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते. बार्शी वकिल संघाची सभासद संख्या पाचशेहून अधिक असली तरी फक्त 281 सभासद मतदानासाठी पात्र ठरले होते. त्यापैकी 263 सभासदांनी मतदान केले.

खजिनदार, लायब्ररी चेअरमन व व्यवस्थापन समिती सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून ही निवडणूक पार पडली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. विकास जाधव यांनी दिली.

यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी ऍड.  सुनील कुलकर्णी, ऍड. शंकर ननवरे, लायब्ररियन ऍड. अक्षय रानमाळ हे उपस्थित होते.
दिवसभर मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर लगेचच मतमोजणी झाली. निकाल जाहीर होईपर्यंत आवारात पिन ड्रॉप सायलेन्स होता. निकाल जाहीर होताच एकच जल्लोष झाला.

नूतन अध्यक्ष ॲड. अविनाश जाधव यांनी वकिल संघाच्या सर्व सभासदांना सोबत घेवून येत्या वर्षभरात वकिलांच्या हिताचे अनेक उपक्रम राबवू, अशी ग्वाही दिली.

* जातीवाचक शिवीगाळ करुन लूटमार केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल

बार्शी : जातीवाचक शिवीगाळ, तलवारीने वार करुन लूटमार केल्याप्रकरणी तालुक्यातील शेलगाव (मा.) येथील विकास लहु वाघमोडे, सागर लहु वाघमोडे, विनोद नाना सलगर , जयपाल पाटील यांच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अजय ऊर्फ विजय जगन्नाथ पारसे (रा. सुभाष नगर, बार्शी)  यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे मौजे शेलगाव हद्दीत नितीन ऐजिनाथ आगलावे यांच्या विट भट्टीवर कामाला आहेत. ते इतर कामगार सुधीर दशरथ आगलावे, करविन अरूण काष्टेकर यांच्यासह मजुरी घेण्यासाठी बावी येथील फ्रेंड हॉटेल मध्ये सायंकाळी 7 वा. गेले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तिथे आरोपी बाहेरून दारू पिवुन जेवन करण्यासाठी आले होते. त्याचे 610 /-रू बिल झाले. त्या बिलाची पावती वेटर कल्याण दत्तात्रय जाधव त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यावेळी विकास वाघमोडे याने त्याला शिवीगाळ करून काऊंटरवर बसलेले हॉटेलचे मालक नितीन आगलावे यांच्याकडे आला. त्यावेळी त्याने येवढे बिल कशाचे झाले. तुम्ही लय माजलात, मी बिल देत नसतो असे म्हणून त्याच्यासोबत आलेले इतर तिघांना बोलावुन घेतले.

त्यावेळी विनोद नाना सलगर व जयपाल पाटील या दोघांनी नितीन आगलावेला पकडले. त्याचवेळी विकास व सागर बाहेर पळत गेले व विकासने त्याच्या मोटार सायकलला बांधलेली तलवार आणली व सागर गज घेऊन आला. विकास व सागर यांनी हॉटेलच्या गल्ल्‌यात ठेवलेले 25 हजार व विट भट्टीचे एक लाख असे सव्वा लाख रूपये व त्यांच्या हातातील 15 ग्रँम वजनाचे सोन्याचे ब्रासलेट तोडुन घेतले.

त्यावेळी महादेव फकिरा आगलावे त्यांच्याकडे येत असताना  विकास  याने डाव्या कानाजवळ तलवारीने वार केला. त्यावेळी वेटर कल्याण जाधव, टेंपो चालक समाधान झाडे व फिर्यादी सोडवण्यासाठी मध्ये पडले असता सागर यांने त्यांना गजाने मारले.  स्वॅप मशिन व काउंटर फोडुन नुकसान केले. तसेच जातीवाचक शिवीगाळ करत पळुन जाताना बाहेर लावलेल्या इंडिका गाडीच्या काचा फोडुन नुकसान केले.

विनोद नाना सलगर याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तो मित्र विकास लहु वाघमोडे याच्यासह हॉटेल फ्रेंड्सस येथे जेवण्यासाठी गेला हेाता. बील जास्त झाल्यामुळे मालक नितीन आगलावे आणि विकास यांच्यात शिवीगाळ केली. त्याचा राग आल्याने महादेव फकिरा आगलावे याने तलवारीने विकास यांचे डोक्यात, उजव्या हातावर गंभीर वार केले. त्यावेळी नितीन आगलावे यांनेही तलवारीने वार केले. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. यावेळी माजी सरपंच उमेश मारकड आदींनी त्यास उपचारासाठी नेले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Jadhav #President #Barshi #BarAssociation #Patil #VicePresident, #बार्शी #वकील #संघ #अध्यक्षपदी #ॲडअविनाशजाधव #उपाध्यक्षपदी #भगवंतपाटील
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रॉपर्टीच्या वादातून माजी मंत्र्याच्या नातवाचा अंदाधुंद गोळीबार
Next Article शेळगीत नवजात अर्भक आढळल्याने खळबळ

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?