इस्लामाबाद, 30 जून (हिं.स.)
पाकिस्तान
क्रिकेट मंडळाने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की, “खेळाचे सखोल ज्ञान, आंतरराष्ट्रीय अनुभव आणि इंग्लिश
काउंटी सर्किटमधील यश यामुळे त्यांची या पदासाठीही निवड अगदी योग्य आहे. पीसीबीला विश्वास आहे की, अझहरच्या
मार्गदर्शनाखाली, पाकिस्तानचा कसोटी संघ जागतिक स्तरावर आपल्या कामगिरीत नवी उंची
गाठेल.”
पाकिस्तानच्या
प्रशिक्षक म्हणून महमूद यांचे पहिले काम म्हणजे या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या
डब्ल्यूटीसी विजेत्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या घरच्या
मालिकेसाठी संघ तयार करणे. २०२३-२५ च्या डब्ल्यूटीसी सायकलमध्येपाकिस्तान २७.९८ गुणांसह क्रमवारीत
तळाशी राहिला होता. या संघाला पाच कसोटीत विजय मिळवता आला आणि नऊ सामने गमवावे लागले
होते. दरम्यान, अझहर महमूद यांनी पाकिस्तानसाठी २१ कसोटी आणि १४३ एकदिवसीय सामने
खेळले आहेत. त्याचप्रमाणे २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
होण्यापूर्वी १९९९ च्या एकदिवसीय विश्वचषकात उपविजेतेपद पटकावणाऱ्या संघाचा भाग ते
होते. एप्रिल २०२४ मध्ये राष्ट्रीय संघासोबत त्यांचा सध्याचा कार्यकाळ सुरू
होण्यापूर्वी ते २०१६ ते २०१९ पर्यंत पाकिस्तानचे गोलंदाजी प्रशिक्षकही होते.