Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बाबा सिद्दीकी हत्या – मोबाईल क्रमांकावरून फसवणुकीचा प्रयत्न, दिल्लीत संशयित अटकेत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

बाबा सिद्दीकी हत्या – मोबाईल क्रमांकावरून फसवणुकीचा प्रयत्न, दिल्लीत संशयित अटकेत

admin
Last updated: 2025/07/07 at 3:59 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 7 जुलै (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करून फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी दिल्लीच्या बुराडी परिसरातून एका संशयिताला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने बनावट कागदपत्रांच्या आधारे हा मोबाईल क्रमांक दुसऱ्या सिमकार्डवर सुरू करण्याचा कट रचला होता.

गेल्या वर्षी विजयादशमीच्या दिवशी, वांद्रे येथील खेरवाडी परिसरात भरदिवसा गोळीबार करत लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित गुंडांनी बाबा सिद्दीकी यांची निर्घृण हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली होती. हत्येनंतर पोलिसांनी मारेकऱ्यांपैकी काही जणांना अटक केली असली तरी, हत्येचा सूत्रधार कोण होता याचा तपास अद्याप सुरूच आहे.

दरम्यान, या प्रकरणात आता सायबर फसवणुकीचा धागा समोर आला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मोबाईल क्रमांक त्यांच्या कुटुंबियांनी व्यवसायासाठी सुरू ठेवला होता. मात्र, २४ जून रोजी त्यांच्या पत्नी शेहझीन सिद्दीकी यांच्या नावाने मोबाईल सेवा प्रदाता कंपनीला एक ई-मेल पाठवण्यात आला, ज्यात मोबाईल क्रमांक ट्रान्सफरसाठी अधिकृत स्वाक्षरी हक्काची माहिती मागवण्यात आली होती.

या ई-मेलसोबत शेहझीन सिद्दीकी यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, जीएसटी क्रमांक तसेच त्यांच्या कंपनीचे लेटरहेड वापरून अर्ज करण्यात आला होता. ही माहिती पाहून मोबाईल कंपनीने संबंधित अर्ज प्राप्त झाल्याचे ई-मेलद्वारे कळवले आणि त्या ई-मेलची सीसी सिद्दीकी यांची मुलगी डॉ. अर्शिया यांनाही पाठवण्यात आली. त्यामुळे हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले.

यानंतर डॉ. अर्शिया सिद्दीकी यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांनी दिल्लीतील बुराडी परिसरातील आरोपीला ताब्यात घेतले, ज्याच्यावर यापूर्वीही सायबर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. मुंबईतही आरोपीविरुद्ध दोन गुन्हे दाखल असून, एक प्रकरण मुख्य दंडाधिकारी न्यायालय क्रमांक ३७, आणि दुसरे बोरीवली न्यायालय क्रमांक १७ येथे सुरू आहे. बोरीवलीतील प्रकरणात आरोपीला जामीन मिळाला होता.

या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९(२) (फसवणूक करणे), ६२ (कैदेस पात्र असलेल्या गुन्ह्याचा प्रयत्न), ३३५ (खोटे दस्तऐवज तयार करणे), ३३६ (२) व ३३६ (३) (दस्तऐवजांचे बनावटीकरण), आणि ३४०(२) (बनावट इलेक्ट्रॉनिक नोंदी खऱ्या असल्याचे भासवणे) या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील हा नवा धागा सायबर फसवणुकीशी जोडला गेल्यामुळे पोलिसांचा तपास आणखी व्यापक करण्यात येणार आहे. आरोपीने हे कृत्य कोणाच्या सांगण्यावरून केले, त्यामागे अजून कोणी आहे का, हे तपासाचे पुढील टप्प्यात स्पष्ट होईल.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला
Next Article गुरु आणि गुरूंचे जीवनातील महत्त्व !

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?