○ अंत्यसंस्कार करण्यासही दिला नकार
लखनौ : भाजपच्या विजयाचे जल्लोष करत पेढे वाटणाऱ्या मुस्लिम युवकाची त्याच्याच नातेवाईकांनी हत्या केली. उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील ही घटना आहे. बाबर अली असे मृतक तरुणाचे नाव आहे. बाबरने पेढे वाटताच त्याचे नातेवाईक व शेजाऱ्यांनी जबर मारहाण केली व छतावरुन त्याला खाली फेकून दिले. धक्कादायक म्हणजे, मारहाण करणाऱ्यांमध्ये महिलांचाही समावेश होता. दरम्यान, मुख्यमंत्री योगींनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पार पडलेल्या निवडणुकांनंतर त्यात भारतीय जनता पार्टीला मिळालेले यश साजरे करणाऱ्या एका मुस्लीम युवकाला त्याच्या शेजाऱ्यांनी ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कुशीनगर जिल्ह्यातील कटघरही गावात २० मार्चला ही घटना घडली. बाबर अली असे या युवकाचे नाव असून त्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या रुग्णालयात त्याचा २५ मार्चला मृत्यु झाला. पोलिसांनी यासंदर्भात तपास करत आरिफ आणि ताहीर या दोन मुलांना अटक केली आहे. इतरांचाही शोध सुरू आहे. After the victory of BJP, it was felt that Babar Ali was killed by the mob
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
भाजपाचा विजय झाल्याबद्दल बाबर अली आनंद साजरा करत होता आणि मिठाई वाटत होता. त्याचा राग येऊन त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला जबर मारहाण केली. तेव्हा त्याला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर लखनऊ रुग्णालयात दाखल केले गेले. पण तिथे त्याचा मृत्यु झाला.
बाबरचा मृतदेह गावात आणल्यानंतर स्थानिकांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. ही बातमी जिल्हा प्रशासनाला कळल्यानंतर हे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. भाजपाचे आमदार पी.एन. पाठकही तिथे गेले. स्थानिकांची समजूत घातल्यानंतर बाबर अलीच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्काराची परवानगी दिली.
बाबर अलीच्या कुटुंबियांनी सांगितले की, बाबर भाजपाचा विजय साजरा करत असल्यामुळे शेजारी त्याच्यावर चिडले होते. याआधीही बाबर अलीने भाजपासाठी काम केले होते. त्यावेळीही त्याला धमक्या देण्यात आल्या होत्या. त्याने स्थानिक पोलिसांकडे सुरक्षेची मागणीही केली होती. पण त्याला ती सुरक्षा देण्यात आली नाही. अखेर शेजाऱ्यांनी त्याला जबर मारहाण केली आणि छतावरून खाली फेकले. बाबर अलीच्या पत्नीने रामकोला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार पी.एन. पाठक आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहचले. या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पीडितांना देण्यात आले. त्यानंतर कुटुंबीय मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास तयार झाले. बाबरच्या पार्थिवाला आमदारांनी स्वतः खांदा दिला. ही घटना अत्यंत लाजिरवाणी असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले.