Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन स्थगित, उदय सामंतांची शिष्टाई
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन स्थगित, उदय सामंतांची शिष्टाई

admin
Last updated: 2025/06/14 at 4:12 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मागण्या मान्य न झाल्यास 2 ऑक्टोबरला मंत्रालयात शिरण्याचा इशारा

अमरावती, 14 जून (हिं.स.)

शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी गत 7 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांनी शनिवारी आपले उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. या प्रकरणी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 2 ऑक्टोबर रोजी आम्ही थेट मंत्रालयात शिरू, असे ते या प्रकरणी सरकारला इशारा देताना म्हणालेत.

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू गत 7 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण करत होते. या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. पण त्यानंतरही बच्चू कडू यांनी आपले उपोषण नेटाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला होता. त्यांनी परवापासून थेट अन्नत्याग करण्याचाही इशारा दिला होता. त्यामुळे मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी तातडीने त्यांची भेट घेऊन त्यांना सरकार आपल्या मागण्यांवर सकारात्मक असल्याचे सांगत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर बच्चू कडू यांनी उदय सामंत यांच्या विनंतीचा मान राखत आपले अन्नत्याग उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. उद्याचे चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

2 ऑक्टोबरला थेट मंत्रालयात शिरणार

बच्चू कडू उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले, सरकारने आपल्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आपण हे आंदोलन मागे घेत नाही, तर स्थगित करत आहोत. सरकारने आपल्या मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, तर 2 ऑक्टोबर रोजी आपण थेट मंत्रालयात शिरू. आपण सरकारला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा चकवा देऊ. सांगू नागपूरला व जाऊ मुंबईला. यांना आपण एकदा छत्रपतींचा गनिमी कावा दाखवू.

मुख्यमंत्री सध्या आम्हाला तारीख सांगण्यास तयार नाहीत. पण आम्ही त्यांना 2 ऑक्टोबरची तारीख दिली आहे. या तारखेपर्यंत सरकारला कर्जमाफी द्यावीच लागेल. अन्यथा आम्ही त्यांना माफ करणार नाही. आत्ता आपण हे अन्नत्याग आंदोलन स्थगित करत आहोत. मी कार्यकर्त्यांचा अंत पाहू शकत नाही. ते माझ्याशिवाय उठण्यास तयार नाहीत. एक आज्जी तर ऐकण्यास तयारच नव्हती. सर्वच जातीधर्माच्या लोकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांचे मी आभार मानतो. हे यश आमचे नव्हे तर इथे येणाऱ्या सर्वांचे यश आहे.

—————

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारतीय सैन्यात दाखल झाले 419 कॅडेटस
Next Article आयएसएसएफ विश्वचषक २०२५ : सुरुची सिंगने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये जिंकले सुवर्णपदक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?