Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: करमाळ्याचे बागल भाजपच्या वाटेवर,  विजयदादांच्या साक्षीने दिले संकेत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

करमाळ्याचे बागल भाजपच्या वाटेवर,  विजयदादांच्या साक्षीने दिले संकेत

Surajya Digital
Last updated: 2023/03/14 at 7:07 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा) ● हात जोडले…

सोलापूर : सोलापूरच्या साखर कारखानदारीत सतत चर्चेत असणाऱ्या करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे चित्र रविवारी पार पडलेल्या एका सोहळ्यात दिसून आले. सत्ताधारी बागल गट भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत यातून मिळाले. Bagal of Karmala on BJP’s way, Vijaydada’s testimony gave the signal

माजी मंत्री विजयसिंह मोहिते – पाटील  यांच्या उपस्थितीत स्व. दिगंबर बागल यांच्या जयंती निमित्त झालेल्या एका कार्यक्रमाला भाजप नेत्यांची खास उपस्थिती होती. विशेष म्हणजे आदिनाथ सहकारी तत्वावर सुरू करण्यासाठी मदत केलेले आरोग्य मंत्री तानाजी सावंत व माजी आमदार नारायण आबा पाटील यांची अनुपस्थिती दिसून आली.

करमाळा येथे ९ मार्चपासून (कै.) दिगंबरराव बागल कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेतील भाजप नेत्यांची नावे आणि त्यांनी कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती पाहता बागल भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा करमाळ्यात रंगली आहे. विशेष म्हणजे एका नेत्याने थेट पक्षात प्रवेश करण्याचे आवतानच बागलांना दिले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर आपण नेमके कोणत्या पक्षाबरोबर आहोत, याचा धांगपत्ता अद्यापपर्यंत बागल गटाने कुणालाही लागू दिला नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतरसुद्धा आपण कोणत्या शिवसेनेबरोबर आहोत, याचाही अंदाज त्यांनी कोणाला येऊ दिला नव्हता. मागील विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढल्यानंतरही झालेला पराभव लक्षात घेऊन बागल गटाने अतिशय सावध पवित्रा घेतला.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्राप्त परिस्थितीनुसार बागल गटाने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या सर्वांबरोबरच सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मात्र त्यांनी भाजपशी जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे.

 

काही दिवसांपूर्वी मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी टेंभुर्णी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. रश्मी बागल यांनीही भाजप नेत्यांच्या भेटी घेतल्याची चर्चा होती.

 

● हात जोडले…

 

प्रास्ताविक करताना मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे हात जोडून कारखान्यांना मदत करण्याची विनंती केली. बागल गटाच्या कारखान्यासमोरील अडचणी पाहता आणि तालुक्यातील राजकीय परिस्थिती विचारात घेता बागल लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी जाणकारांमध्ये चर्चा सुरू आहे.

कृषी महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेत तानाजी सावंत यांचे कोठेही नाव दिसून आले नाही, त्यामुळे सावंत यांच्या माध्यमातून बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

You Might Also Like

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

TAGGED: #Bagal #Karmala #BJP's #way #Vijaydada's #testimony #signal, #करमाळा #बागल #भाजप #वाटेवर #विजयदादा #साक्षी #संकेत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर । दिग्दर्शक ‘भाऊ’ने दिला, तरुणीला ‘कास्टिंग काऊच’ चा ‘धक्का’
Next Article जुन्या पेन्शन योजना आंदोलनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल; प्राथमिक शिक्षक संघाची संपातून माघार

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?