Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बैलगाडी शर्यत सुरु करा, मातोश्रीवर धडकणार सांगलीतून अनवाणी पदयात्रा; मुख्यमंत्री ठाकरेंनी शब्द पाळावा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

बैलगाडी शर्यत सुरु करा, मातोश्रीवर धडकणार सांगलीतून अनवाणी पदयात्रा; मुख्यमंत्री ठाकरेंनी शब्द पाळावा

Surajya Digital
Last updated: 2020/11/14 at 10:49 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सांगली : बैलगाडीवरील शर्यत बंदी उठवावी या मागणीसाठी सांगली ते मुंबई बैलगाडी ओढत पदयात्रा निघाली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी हे यात्रा सुरू केली आहे. अनवाणी पायाने बैलगाडीमध्ये प्रतिकात्मक बैलाची अंत्ययात्रा घेऊन जाधव हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर धडक देणार आहेत. हिवाळी अधिवेशनात बैलगाडी शर्यतीला मंजुरी द्यावी,  अशी मागणी जाधव यांच्याकडून करण्यात आली आहे. 24 नोव्हेंबर रोजी जाधव हे मातोश्रीवर धडकणार आहेत.

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत मागणी झाली. ग्रामीण भागात अनेकदा आंदोलने झाली आहेत. राज्यातील ग्रामीण भागात बैलगाड्या स्पर्धांचे प्रचंड आकर्षण आहे. मात्र 2011 साली मुंबई उच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली होती. त्यामुळे गावच्या जत्रांमध्ये तमाशा आणि कुस्तीच्या फडाबरोबर रंगणाऱ्या बैलगाड्या शर्यती बंद झाल्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

विविध शेतकरी संघटना बैलगाडीवरील शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी मागणी करत आहेत. मात्र, सरकारकडून या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या मागण्यांबाबत सांगलीच्या इस्लामपूर मधील सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव हे सुद्धा वारंवार मागणी करत आहेत.

* मुख्यमंत्री ठाकरेंनी शब्द पाळावा

4 वर्षांपूर्वी जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आमचे सरकार आल्यावर बैलगाडी शर्यतीला परवानगी देऊ, असा शब्द दिला होता. त्यामुळे आता उध्दव ठाकरे यांनी त्यांचा शब्द पाळावा, त्याची आठवण करून देण्यासाठी जाधव यांनी सांगली ते मुंबई बैलगाडी पदयात्रा दिवाळीच्या दिवशी सुरू केली आहे. यात बैलांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा घेऊन जाधव यांनी ही पदयात्रा काढली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात बैलगाडी शर्यतवरील बंदी उठवावी, अशी मागणी विजय जाधव यांनी केली आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #बैलगाडी #शर्यत #सुरुकरा #मातोश्रीवरधडकणार #सांगलीतून #अनवाणीपदयात्रा #मुख्यमंत्री #ठाकरेंनी #शब्दपाळावा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ही श्रींची इच्छा! राज्यातील प्रार्थनास्थळे पाडव्यापासून सुरु
Next Article ट्रॅव्हलर बसचा भीषण अपघात, पाच ठार, एकजण निसटल्याने अपघात समजला

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?