अमरावती, 3 जून (हिं.स.) :विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्य भारतासह विविध देशात सुद्धा चालते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेत प्रमुख भूमिका होती. त्याचाच धागा धरत बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक निरजजी दाणेरिया हे विदर्भाच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम ला भेट दिली.
व राष्ट्रसंतांच्या महासमाधीचे दर्शन घेतले व आश्रमय परिसराची माहिती जाणून घेतली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रीय विचारांवर चर्चा केली. याप्रसंगी संस्थेचे डॉ. राजारामजी बोथे, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नवीनजी जैन, सिद्धूजी सोलंकी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री रुपेश राऊत, शरद कांडलकर, विजय पुनसे, अजय उमप, सुधीर होले आदी उपस्थित होते.