Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बाळूमामांचा अवतार म्हणवणा-या मनोहर उर्फ मामा भोसलेस सुनावली पोलीस कोठडी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

बाळूमामांचा अवतार म्हणवणा-या मनोहर उर्फ मामा भोसलेस सुनावली पोलीस कोठडी

Surajya Digital
Last updated: 2021/09/11 at 9:31 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

बारामती : कॅन्सर झालेल्या रुग्णास कॅन्सर बरा करतो, असे सांगून बारामती शहरातील एकाची २ लाख ५१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी मनोहर उर्फ मामा भोसलेला (वय 39, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) यास अतिरीक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश डी.एन. गिऱ्हे यांनी १६ सप्टेंबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

त्याला सायंकाळी उशीरा बारामती तालुका पोलिस ठाण्यात आणण्यात आले. आज (शनिवार) सुट्टीच्या न्यायाधिशांपुढे त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. भोसले याच्या अन्य दोन साथीदारांना अद्याप अटक करायची आहे, गुन्ह्यात घेतलेली रक्कम व वापरलेले वाहन जप्त करायचे आहे.यासह अन्य बाबींवर तपास करणे बाकी असल्याने पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. तर भोसले यांना अटक करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन झालेले नाही.

शशीकांत खरात (रा.साठेनगर, कसबा बारामती, ता बारामती. जि पुणे) यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तक्रारदार खरात यांच्या वडीलांना थायरॉईड कॅन्सर हा दुर्धर आजार झाला आहे. त्यामुळे खरात हे मनोहरमामा भोसले भोंदुबाबाच्या मौजे सावंतवाडी, गोजूबावी (ता. बारामती जि. पुणे ) मठामध्ये गेले. त्याने तो बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव केला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तक्रारदार यांच्या वडिलांचा गळ्यावरील थायरॉईड कॅन्सर बरा करतो, असे सांगून त्यावरील औषध म्हणून बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिले. तसेच विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यासोबत संगनमत करून वेळोवेळी चढावा, अभिषेक व भेटीसाठी त्यांचेकडून एकुण २,५१,५००/- रुपये त्यांचे व त्यांचे वडीलांचे जिवाचे बरे वाईट होईल अशी भीती घालून देण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली आहे. पैसे परत मागितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्यात दाखल आहे.

या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी मनोहर मामाला शुक्रवारी (दि १०) सालपे (जि.सातारा) येथे फार्महाऊसवर जाऊन ताब्यात घेतले आहे. त्यानंतर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात आणत त्याला शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली.

आज मनोहरमामा यास न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीच्यावतीने आज अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजु मांडली. तर पोलीस प्रशासनाच्यावतीने सरकारी वकील किरण सोनवणे यांनी बाजु मांडली. दोन्ही बाजुचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश गिऱ्हे यांनी मनोहरमामा यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, मनोहरमामा भोसले यांना केलेली अटक बेकायदा आहे. बनावट तक्रारदार उभा करुन सदरच्या गुन्ह्याबाबत तीन वर्षांनंतर बनावट गुन्हा दाखल केल्याचा दावा आरोपीचे वकील ठोंबरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मनोहरमामाच्या भक्तांसह समर्थकांची न्यायालय परीसरात गर्दी झाली होती.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

TAGGED: #Manohar #Mama #Bhosle #claims #incarnation #Balumama #sentenced #police #custody, #बाळूमामा #अवतार #मनोहर #उर्फ #मामाभोसले #सुनावली #पोलीसकोठडी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पालिकेतील कर्मचारी बनला सराईत गुन्हेगार; 50 मोबाइलवर मारला डल्ला
Next Article खाद्यतेल अखेर स्वस्त; मोदी सरकारचा मोठा निर्णय

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?