Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अफगाणिस्तानच्या महिला खेळाडूंवर बंदी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

अफगाणिस्तानच्या महिला खेळाडूंवर बंदी

Surajya Digital
Last updated: 2021/09/09 at 2:24 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

काबूल : तालिबानने नव्या सरकारची स्थापना करताच अफगाणिस्तानच्या महिला खेळाडूंवर बंदी घातली आहे. अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला आता इतर स्पर्धांमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. महिलांनी खेळात भाग घेणे गरजेचे नाही, कारण त्यामुळे त्यांचे शरीर दिसून पडते, असे, तालिबानचा सांस्कृतिक आयोगाचा उपप्रमुख अहमदुल्लाह वासिकने म्हटले आहे. महिलांच्या शिक्षण घेण्यावरही निर्बंध लागू करण्यात आले आहे.

नुकतंच तालिबानच्या सरकारने आपला अजेंडा जाहीर केला आहे. यापुढे अफगाणिस्तानमध्ये  शरिया कायदा लागू करणार असल्याची घोषणा तालिबानच्या नव्या सरकारने केली आहे. देशात इस्लामिक नियम आणि शरिया कायदा लागू करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जातील असं तालिबानच्या नव्या सरकारचा प्रमुख मुल्ला मोहम्मद हसन अखुंद याने स्पष्ट केलं आहे. आमच्या समाज वर्तुळात महिलांचा सक्रिय सहभाग आम्हाला हवा आहे. आमच्या चौकटीत राहून महिलांनी नोकरी किंवा शिक्षण घेतलं तर आमची मनाई नाही. अफगाणिस्तान इस्लाम धर्माच्या चौकटीत चालेल, असंही त्यांनी म्हटलंय.

अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर आता अफगानिस्तानच्या क्रिकेटवर संकट आलं आहे.  क्रिकेट ऑस्ट्रेलियानं नोव्हेंबर महिन्यात अफगाणिस्तान विरुद्ध खेळला जाणारा एकमेव कसोटी सामना रद्द करण्याचे संकेत दिले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

क्रिकेट ऑस्ट्रेलिया म्हणणं आहे की, जर तालिबान अफगानिस्तानमधील महिला क्रिकेटवर बंदी आणणार असेल तर ते नोव्हेंबरमधील हा कसोटी सामना रद्द करतील.

क्रिकेट टीमच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली आहे.  क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आलं आहे की, जर तालिबान सरकारकडून महिलांना क्रिकेट खेळू दिलं जाणार नाही हे खरं असेल तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तानमधील कसोटी सामना रद्द केला जाईल. अफगाणिस्तानमध्ये महिला क्रिकेटपटूंवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. जर तालिबान्यांनी महिलांना क्रिकेट खेळू दिले नाही, तर आम्ही अफगाणिस्तानच्या पुरुष क्रिकेटपटूंच्या संघाला कोणत्याही स्पर्धेसाठी आपल्या देशात प्रवेश देणार नाही, असे ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. खेळताना शरीर दिसते, असे म्हणत तालिबानने महिला खेळाडूंवर बंदी घातली आहे.

जर तालिबाननं अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला बॅन केलं तर अफगाणिस्तानला आयसीसीच्या नियमित सदस्यत्वाचा दर्जा देखील गमवावा लागेल. आयसीसी त्याच देशांना नियमित सदस्यत्व देतं ज्या देशाचे महिला क्रिकेट संघ देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात.

You Might Also Like

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

TAGGED: #Ban #Afghan #women #players, #अफगाणिस्तान #महिला #खेळाडूंवर #बंदी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आज भाद्रपद शुद्ध तृतिया : “श्रीहरतालिका” म्हणजे काय ?
Next Article छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सर्व आरोपातून मुक्तता!

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?