Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पश्चिम बंगालमध्ये हिंसक वळण; भाजप अध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

पश्चिम बंगालमध्ये हिंसक वळण; भाजप अध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

Surajya Digital
Last updated: 2020/12/10 at 4:33 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कोलकाता : पश्चिम बंगालमधील राजकारणाला हिंसक वळण मिळालं आहे. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन्ही नेते कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालले असता ताफ्यातील त्यांच्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला.

जे पी नड्डा यांच्या ताफ्यातील वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. २०२१ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे पी नड्डा कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पोहोचले होते.

कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावरही हल्ला करण्यात आला आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी कारमधून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांचा ताफा जात असताना रस्त्यावर निषेध करत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होत असल्याचं दिसत आहे. तसंच दगडफेक करत गाडीच्या काचाही फोडल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये गाडीमध्ये आलेला दगडही त्यांनी दाखवला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

“बंगाल पोलिसांना जे पी नड्डा यांच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती. पण पुन्हा एकदा बंगाल पोलीस अपयशी ठरली. पोलिसांसमोर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि माझ्या गाडीवर दगडफेक केली,” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

याआधी दिलीप घोष यांनी बुधवारी जे पी नड्डा उपस्थित असणाऱ्या भाजपाच्या कार्यक्रमात योग्य सुरक्षा नसल्याचा आरोप केला होता. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला होता.

* त्यांचेच गुंड हिंसाचार करत आहेत

भाजपाने केलेल्या आरोपांवर तृणमूल काँग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली असून पक्षाचे नेते मदन मित्रा यांनी म्हटलं आहे की, “त्यांचेच गुंड हिंसाचार करत आहेत”. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे. हा सर्वसामान्यांना निषेध होता असं ते म्हणाले आहेत. दुसरीकडे टीएमसीचे नेते हकीम यांनी भाजपा बाहेरील लोकांना राज्यात आणत असून राज्य सरकारला याची माहितीही देत नसल्याचा आरोप केला आहे.

You Might Also Like

शरद पवार गट एका विचारधारेवर चालणारा पक्ष – प्रा. डॉ.हेमंत देशमुख

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

TAGGED: #पश्चिमबंगालमध्ये #हिंसकवळण #भाजपअध्यक्षांच्या #गाडीवर #दगडफेक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माफ करा…पण, खूपच प्रश्न मागं ठेवून गेलाय मेलेला गवा…
Next Article राज्यमंत्र्यांनी केंद्रीय राज्यमंत्री दानवेंच्या घरात घुसून मारण्याची केली भाषा, राजू शेट्टींनीही केली टीका

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?