Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नाणेफेक जिंकणाऱ्या बँक ऑफ इंडियाने सुपर ओव्हरमध्ये मारली बाजी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळसोलापूर

नाणेफेक जिंकणाऱ्या बँक ऑफ इंडियाने सुपर ओव्हरमध्ये मारली बाजी

Surajya Digital
Last updated: 2021/12/11 at 7:46 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर – बँक ऑफ इंडियाच्या क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून सामना बरोबरीत आणला आणि पुढच्या सुपर ओव्हरमध्ये एमएसईबी संघाच्या खेळाडूंना एकही धाव न काढू देता तंबुत पाठवून बाजी मारली. सुर्या ग्रुपच्या वतीने आयोजित सुर्या कार्पोरेट ट्रॉफी 2021 च्या क्रिकेट सामन्याला आज (शनिवार, 11 डिसेंबर) सकाळी वल्याळ मैदानावर सुरूवात झाली.

नगरसेवक नागेश वल्याळ, सन्मित्र डेव्हलपर्सचे अनिकेत कलशेट्टी, निर्मल डेव्हलपर्सचे जयेश शहा, प्रसिध्द मधुमेह तज्ञ डॉ. भास्कर पाटील, भागवत असोसिएटसचे मनोज भागवत, प्रकाश बाबा, जयंत होलेपाटील, सुर्या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुर्या कार्पोरेट ट्रॉफी सामन्याला प्रारंभ झाला.

पहिल्याच क्रिकेट सामन्यात बँक ऑफ इंडिया विरूध्द एमएसईबी संघामध्ये लढत झाली. नाणेफेक जिंकून बँक ऑफ इंडियाच्या संघाने गोलंदाजी स्विकारली. 8 ओव्हरमध्ये एमएसईबीच्या संघाचे 5 गडी बाद करीत 93 धावावर त्यांना रोखले. तर बँक ऑफ इंडियाच्याने आठ गडी गमावून 93 धावा करीत सामना बरोबरीत ठेवला.

त्यानंतर आयोजकांनी सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार बँक ऑफ इंडियाच्या खेळाडूंनी धुव्वाधार फलंदाजी करीत नाबाद 14 धावा करीत 15 धावाचे आव्हान एमएसईबी संघासमोर ठेवले होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

परंतु एमएसईबी संघाच्या फलंदाजांनी एकही धाव न तंबुत परत जाणे पसंत केल्याने बँक ऑफ इंडियाच्या संघाने उद्घाटनाचा हा सामना रोमहर्षक करीत जिंकला.

त्यानंतर दुसरा सामना भुजल ऑफिस विरूध्द एचडीएफसी बँक, तिसरा सामना ओसवाल फायनान्स विरूध्द उज्जीवन बँक, चौथा सामना पीएफ ऑफिस विरूध्द आयसीआयसीआय बँक, पाचवा सामना जलसंपदा विभाग विरूध्द बँक ऑफ महाराष्ट, आणि सहावा सामना कोटक महिंद्रा विरूध्द कॅनरा बँक असा झाला.

शुभारंभाच्या दिवशीच्या सामन्यासाठी पंच म्हणून महेश शिंदे आणि अक्षय साठे तसेच गुणलेखक रितेश कुलकर्णी तर समालोचक म्हणून शंकर पवार यांनी काम पाहिले. या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी संजय सुरवसे, जयराम मडीवाळ, आप्पा रामदासी, स्वरूप स्वामी, ज्ञानेश्वर लिंबोळे, काशिनाथ औरसंग, विजय कोनापुरे हे विशेष परिश्रम घेत आहेत.

सुर्या कार्पोरेट ट्राफीचे यंदाचे 10 वे  वर्ष आहे. तब्बल 26 संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. दर शनिवार आणि रविवारी ही स्पर्धा होणार आहे. कर्णिक नगर परिसरातील माजी खासदार लिंगराज वल्याळ पटांगणावर पहिल्यांदाच ही स्पर्धा होत असल्याने परिसरातील क्रिकेट प्रेमींनी सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

TAGGED: #BankofIndia #won #toss #elected #field, #नाणेफेक #बँकऑफइंडिया #सुपरओव्हर #मारली #बाजी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवांच्या वारसांना मिळणार नोकरी
Next Article मनसेच्या ४० समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेला सुरुवात

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?