Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जमावबंदी आदेशाचा भंग आणि जनावरांचे हाल केल्याप्रकरणी राजू शेट्टींसह 40-50 जणांवर गुन्हा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

जमावबंदी आदेशाचा भंग आणि जनावरांचे हाल केल्याप्रकरणी राजू शेट्टींसह 40-50 जणांवर गुन्हा

Surajya Digital
Last updated: 2020/08/28 at 10:40 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकत्रित जमाव जमवू नये, या आदेशाचा भंग करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनने मोर्चा काढला. इतकंच नाही तर या मोर्चासाठी आणलेल्या जनावरांचेही प्रचंड हाल केले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह प्रमुख 11 आयोजक व इतर 40 ते 50 जणांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सरकारी फिर्यादीत उल्लेख केल्यानुसार, फिर्यादीला स्वाभिमानीच्या दूध दरवाढ आंदोलनाची माहिती सोशल मीडियाद्वारे तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून समजली. त्यानुसार शहर पोलीस अधिकाऱ्यांमार्फत योग्य तो बंदोबस्त लावण्यात आला. काल गुरुवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी व त्यांचे कार्यकर्ते शारदा प्रांगणाजवळ एकत्र जमले. शेख यांनी एमएच 42 व एमएच 7471 या पिकअप वाहनातून 3 गायी दाटीवाटीनं मोर्चासाठी बसवून आणल्या होत्या. कार्यकर्त्यांच्याही तोंडाला मास्क नव्हते. याशिवाय त्यांनी सोशल डिस्टेंसिंगचंही पालन केलं नाही असंही फिर्यादीत म्हटलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याची नोटीस राजू शेट्टी यांना बजावली. मोर्चा काढू नये, असंही त्यांना सांगण्यात आलं. तरी देखील मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या पुढील बाजूस दोन गाईंना दोरीने ओढत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यानंतर प्रशासकीय इमारतीच्या गेटसमोर बेकायदा गर्दी, जमाव जमवत घोषणाबाजी करण्यात आली. तसेच भाषणेही झाली.

फिर्यादीत नमूद केलंय की, मोर्चा व सभेदरम्यान रस्त्याने ये – जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण करण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील झाली. कोरोना विषाणूच्या स्थितीत हयगयीचे व मानवी जीवितास धोका होईल, अशी घातकी कृती करण्यात आली. प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यात आले. दुपारी 3.30 वाजता मोर्चा संपल्यानंतर वरिष्ठांशी चर्चा करून फिर्याद देत असल्याचंही फिर्यादीत म्हटलं आहे.

* यांच्यावर गुन्हा दाखल

ओंकार कैलास सिताप या पोलीस कर्मचाऱ्याने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माजी खासदार राजू शेट्टी, अमरसिंह कदम (रा हिंगणेवाडी ता इंदापूर), विलास विनायक सस्ते (रा खांडज ता बारामती), महेंद्र जयसिंग तावरे (रा सांगवी ता बारामती), विकास उर्फ नानजी बाबर (रा पिंपळी, ता बारामती) धनंजय महामुलकर (रा.फलटण जि सातारा), सचिन खानविलकर (रा नामवैभव टॉकिजशेजारी फलटण, जिल्हा सातारा), डॉ राजेंद्र घाडगे (रा चौधरवाडी ता फलटण), बाळासो शिपकुले, सिवाजी सोडमिसे (दोघे राह. सोमंथळी ता फलटण), राजाभाऊ कदम (रा दौंड, शुगर कारखान्याजवळ, ता दौंड) बुधम मुशक शेख (रा सणसर, ता इंदापूर) व अन्य 40 ते 50 स्वाभिमानीचे कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम 143, 145, 149, 188, 341, 269, 270 सह साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम, प्राण्यांचे अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #बारामती #आंदोलन #राजूशेट्टी #40-50गुन्हा #जनावरांना #हाल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अजित पवार, जयंत पाटील, मुंडेंसह 11 नेत्यांना पोलिसांची नोटीस; सोमवारी न्यायालयात हजर राहा
Next Article जेईई-मेन आणि नीट परीक्षाच्या निर्णयाला सहा राज्याच्या मंत्र्यांचे सुप्रिम कोर्टात आव्हान

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?