Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आता बनावट औषधांना आळा बसणार ! बारकोड, क्यूआरकोड अनिवार्य
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

आता बनावट औषधांना आळा बसणार ! बारकोड, क्यूआरकोड अनिवार्य

Surajya Digital
Last updated: 2022/12/04 at 6:42 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

नवी दिल्ली : आता औषधांवर बारकोड अथवा क्यूआर कोड लावावेच लागणार आहे. या युनिक क्यूआर कोडमध्ये औषधाबाबतची सर्व माहिती असणार आहे. पुढील वर्षांपासून याची अंमलबजावणी सुरु होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या वर्षी यासाठी कायद्यात दुरुस्ती केली होती. Now fake drugs will be stopped! Barcode, QRcode Mandatory Central Govt यामुळे उत्पादन आणि वितरण साखळीच्या माध्यमातून औषधांची सत्यता पडताळता येणार आहे. यातून बनावट औषधांना आळा बसणार आहे. याला ‘औषधांचा आधारकार्ड’ असे म्हटले जात आहे.

पुढील वर्षांपासून औषधांवर बारकोड अथवा क्यूआर कोड लावणे केंद्र सरकारकडून अनिवार्य होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती समोर येत आहे.
देशात विक्री होणाऱ्या औषधांच्या पाकिटांवर बारकोड अनिवार्य करण्यासाठी केंद्र सरकारने मागील वर्षी Drugs and Cosmetic Rules, 1945 कायद्यात दुरुस्ती करत त्यात अनुसूची एच 2 जोडली असल्याचे म्हटले जात आहे.

 

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे उत्पादन आणि वितरण साखळीच्या माध्यमातून औषधांची सत्यता पडताळता येणे शक्य होणार आहे. यातून बनावट औषधांना आळा बसणार असल्याचे म्हटले जात आहे.

पुढील वर्षी 1 ऑगस्ट 2023 पासून याची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाला औषधांचा आधारकार्ड असे म्हटले जाणार आहे. या युनिक क्यूआर कोडमध्ये औषधाबाबतची सर्व माहिती असणार आहे. यामध्ये उत्पादनाचे आयडेंडिटीफिकेशन कोड, औषधाचे नाव आणि जेनेरिक नाव, ब्रॅण्डचे नाव, उत्पादकाचे नाव आणि पत्ता, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, औषधाची मुदत, उत्पादकाचा परवाना क्रमांक आदी माहितीचा समावेश असणार आहे.

केंद्र सरकारकडून या नव्या निर्णयाची माहिती देण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी देशभरातील केमिस्ट आउटलेटवर प्रचार केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

भारतात ॲलेग्रा, डोलो, ऑगमेंटिन, सॅरिडॉन, कॅल्पोल आणि थायरोनॉर्म यांसारख्या औषधांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. या औषधांसह जवळपास 300 औषधे बारकोडसह बाजारात दाखल होणार आहेत. सध्या, पहिल्या टप्प्यात 300 औषधे बारकोडसह येणार आहेत. या 300 औषधांचा भारतीय बाजारपेठेतील वाटा 35 टक्क्यांच्या घरात आहे. त्यानंतर डिसेंबर 2023 पर्यंत इतर सर्व औषधांवर क्यूआर कोड असणार आहे.

 

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे उत्पादन आणि वितरण साखळीच्या माध्यमातून औषधांची सत्यता पडताळता येणे शक्य होणार आहे. यातून बनावट औषधांना आळा बसणार असल्याचे म्हटले जात आहे. पुढील वर्षी 1 ऑगस्ट 2023 पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निर्णयाला ‘औषधांचा आधारकार्ड’ असे म्हटले जाणार आहे. या युनिक क्यूआर कोडमध्ये औषधाबाबतची सर्व माहिती असणार आहे. यामध्ये उत्पादनाचे आयडेंडिटीफिकेशन कोड, औषधाचे नाव आणि जेनेरिक नाव, ब्रॅण्डचे नाव, उत्पादकाचे नाव आणि पत्ता, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, औषधाची मुदत, उत्पादकाचा परवाना क्रमांक आदी माहितीचा समावेश असणार आहे.

केंद्र सरकारकडून या नव्या निर्णयाची माहिती देण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी देशभरातील केमिस्ट आउटलेटवर प्रचार केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

औषधांच्या पाकिटावरील क्यूआर कोडसह केंद्र सरकार आणखी दोन योजनांवर काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये ‘योग्य दरात औषधे’ आणि Pharmacovigilance याचा समावेश असणार आहे. यानुसार, ‘योग्य दरात औषधे’ यामध्ये औषधांसाठी अधिक किंमत वसूल केली जात असल्यास ग्राहकांना तक्रार करता येणार आहे. तर, Pharmacovigilance मध्ये औषधांचा काही दुष्परिणाम होत असल्यास ग्राहकांना त्याची तक्रार करता येणार आहे. या तीन योजनांमुळे ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरुकता येईल असा विश्वास केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

TAGGED: #Now #fakedrugs #stopped #Barcode #QRcode #Mandatory #CentralGovt, #आता #बनावट #औषध #आळा #बारकोड #क्यूआरकोड #अनिवार्य #केंद्रसरकार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरात कर्नाटक भवनसाठी 10 कोटी; बोम्मईंनी पुन्हा काढली महाराष्ट्राची खोड
Next Article सोलापूर। अखेर त्या जुळ्या वधूंसह वरावर गुन्हा दाखल; कायदा काय सांगतो ?

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?