Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दिवसाढवळ्या घरात घुसून चोरट्याने चिमुकल्याचा गळा आवळून गेला खून; आईच्या गळ्यातील गंठन चोरून नेले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरHot Newsगुन्हेगारी

दिवसाढवळ्या घरात घुसून चोरट्याने चिमुकल्याचा गळा आवळून गेला खून; आईच्या गळ्यातील गंठन चोरून नेले

Surajya Digital
Last updated: 2020/08/22 at 11:52 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : एका अज्ञात चोराने घरात घुसून 9 महिन्याच्या चिमुकल्याचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. बार्शी तालुक्यातील वांगरवाडी गावात ही घटना घडली असून याबाबत बार्शी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. बार्शी तालुक्यात दुपारच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सार्थक स्वानंद तुपे असं या खून झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. तर अश्विनी तुपे असे या पीडित आईचं नाव आहे.  धक्कादायक बाब म्हणजे आईसमोरच तिच्या पोटच्या गोळ्याचा गळा आवळण्यात आला. आपल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी आईने क्षमायाचना केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मात्र चोरास याची दया आली नाही. तरीही हल्लेखोराने बाळाचा गळा आवळून बाळाला जमिनीवर टाकले आणि बाळाच्या आईलाही मारहाण करुन तिचे हातपाय बांधून घरातील कपाट उचकटले. कपाटात काहीच न मिळाल्याने आईच्या गळ्यातील 2 ग्रॅम सोन्याचे गंठन चोराने लांबवल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे.

हत्येनंतर अज्ञात आरोपी हा घरासमोरील शेतात पळून गेला. पीडित महिलेचा पती हा ट्रकचालक असून तो चार दिवसापासून बाहेरगावी गेलेला होता. तर दीर आनंद तुपे यांनी याबाबत बार्शी ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी चार ते पाच पथकं रवाना झाली असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #बार्शी #तालुकापोलिस #गळाआवळून #चिमुकल्याचा #खून #तुपे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमध्ये असल्याचे उघड; पाकिस्तानने दिली पहिल्यादाच कबुली
Next Article गृहमंत्री देशमुखांनी राज्यातील प्रवासी, मालवाहतुकीवरील निर्बंध हटविले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?