Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महिला पोलिसावर तलवारीने प्राणघातक हल्ला, माजी सहकार्‍याविरोधात संशय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

महिला पोलिसावर तलवारीने प्राणघातक हल्ला, माजी सहकार्‍याविरोधात संशय

Surajya Digital
Last updated: 2021/01/09 at 3:23 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बार्शी : ड्युटी संपल्यानंतर दुचाकीवरुन घरी परतत असलेल्या महिला पोलिस शिपाईवर तुळजापूर रस्त्यावरील शेलगावच्या अलीकडे चौघाजणांनी तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनात खळबळ माजली आहे.

याबाबत जखमी रेशमा पांडुरंग सुतार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जिल्ह्याच्या पोलिस दलाचे प्रमुख पद महिला अधिकारी भूषवित असताना पोलिस दलातीलच एका महिला कर्मचार्‍यावर दलातील कर्मचार्‍याकडून  अशा प्रकारचा हल्ला झाल्यामुळे पोलिस दलात खळबळ माजली आहे.

रेशमा सुतार या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून त्यांनी यापूर्वी त्यांची छेड काढणार्‍या पोलिस विभागातील कर्मचार्‍यावर संशय व्यक्त केला आहे. अद्यापपर्यंत पोलिसांनी कोणालाही याप्रकरणी ताब्यात घेतलेले नाही. विशेष म्हणजे हल्ल्याचा प्रकार गुरुवारी (ता.7) सायंकाळी 7 वाजता घडला असूनही फिर्याद दुसर्‍यादिवशी दुपारी 3 वाजता दाखल झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रेशमा सुतार या वैराग पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. तेथे त्या कार्यरत असताना त्यांना डोळस या सहकार्‍याने वारंवार त्रास दिला. छेड काढली. त्यामुळे त्यांनी त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्या तक्रारीनंतर त्यांना तात्पुरत्या स्वरुपात बार्शी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात प्रतिनियुक्त करण्यात आले आहे. तर अरोपी पोलिस शिपाई सध्या जिल्हा मुख्यालयात कार्यरत आहे.

गुरुवारी त्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील आपली डयुटी संपवून तालुक्यातीलच साकत पिंपरी या आपल्या गावी शेलगाव(मा.) मार्गे स्कूटीवरुन जात होत्या.   शेलगावच्या अलीकडे अर्धा ते पाऊण किमी. त्या आल्या असता पाठीमागून दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघाजणांपैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या स्कूटीवर लाथ मारली. अचानक बसलेल्या धक्क्याने त्यांचा तोल जावून त्या दुचाकीसह खाली पडल्या.

यावेळी पुढे बसलेल्या व्यक्तीने माझ्यावर गुन्हा दाखल कर, तसेच पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने माझा मेहुणा डोळस वर गुन्हा दाखल करते का, कर अशी धमकी दिली. त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुसर्‍या दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने आत तू कशी घरापर्यंत पोहचते ते बघतोच, तुला आज जिवे ठार मारत असतो. घरापर्यंत तुझं मडंच पोहच करतो, असे म्हणून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील धारदार शस्त्र त्यांच्या डोक्यावर मारला. मात्र सुदैवाने महिला पोलिसाने तो वार चुकविल्यामुळे त्या वाचल्या. यावेळी समोर बसलेल्या व्यक्तीने तिला जिवंत सोडायचे नाही, अशी धमकी दिली.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #महिला #पोलिसावर #तलवारीने #प्राणघातक #हल्ला #माजीसहकार्‍याविरोधात #संशय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजपला मतदान करणा-या एमआयएम नगरसेविकेचे निलंबन
Next Article महाराष्ट्र हादरला! सरकारी रुग्णालयात आग, १० बाळं दगावली

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?