Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बार्शीत शांततेत बंद; पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

बार्शीत शांततेत बंद; पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

Surajya Digital
Last updated: 2020/09/21 at 8:57 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बार्शी : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेला बार्शी बंद आज कडेकोटरित्या शांततेत पार पडला. यावेळी आरक्षण समर्थकांनी तहसीलदारांना निवेदनाव्दारे आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासहित विविध मागण्यांचे सादर केले.

शिवराज्य सेनेचे अध्यक्ष ॲड. हर्षवर्धन पाटील यांनी पंचायत समिती समोरील पाण्याच्या टाकीवर चढून आरक्षण समर्थनाच्या घोषणा दिल्या. जिल्हास्तरीय नियोजनाप्रमाणे स्थानिक आमदारांच्या घरासमोर आसूड ओढ व हलगीनाद आंदोलन करण्यात आले. शहरातील विविध संघटनांनी बंदला पाठींबा दिला.
‘बार्शी बंद’ची तयारी गेले अनेक दिवस चालू होती. त्याचवेळी शहरातील विविध व्यवसायिकांच्या संघटनेला निवेदन देवून त्यांचे सहकार्य अपेक्षिण्यात आले होते. त्यानुसार सर्व संघटनांनी सर्व व्यवहार बंद ठेवण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे आजचा बंद कडेकोटरित्या पार पडला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात, राज्यात 32 टक्के मराठा समाज असून राज्य शासनाने न्या. गायकवाड आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार विधिवत दिलेले आरक्षण उच्च न्यायलयानेही योग्य ठरविले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यास स्थगिती दिल्यामुळे समाजावर अन्याय झाला आहे. त्यामुळे आरक्षणावरील स्थगिती ताबडतोब उठवावी. स्थगिती उठविल्याशिवाय शासनाने कसलीही नोकरभरती करु नये. विद्यार्थ्यांचे चालू  वर्षाचे प्रवेश आरक्षण गृहित धरुनच करावेत. मराठा समाजाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेसाठी व आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, पंजाबराव देशमुख विद्यार्थी वसतीगृहासाठी तत्काळ निधी द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #बार्शी #मराठाआरक्षण #आंदोलन #टाकीवर #चढून
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मराठा आरक्षण : अशोक चव्हाण यांची शरद पवारांसोबत चर्चा
Next Article अकलूजमध्ये शंभर टक्के उस्फूर्त प्रतिसाद; विविध संघटनांनी दिला पाठिंबा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?