Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बार्शी शहरातील रस्ते चिखलात बुडाले; सोशल मिडियावर नगरपालिकेला केले लक्ष्य
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

बार्शी शहरातील रस्ते चिखलात बुडाले; सोशल मिडियावर नगरपालिकेला केले लक्ष्य

Surajya Digital
Last updated: 2020/08/20 at 11:54 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बार्शी : भुयारी गटार योजनेसाठी खोदलेल्या रस्त्यावरील मातीमिश्रित मुरुमामुळे शहरातील बहुतांश रस्ते चिखलात बुडाले आहेत. या रस्त्यावरुन वाट काढणार्‍या पादचारी आणि दुचाकीस्वारांची चिखलात घसरगुंडी होत आहे.  शहरातील रस्ते चिखलात बुडाले असून संतप्त नागरिकांनी सोशल मिडियावर नगरपालिकेला लक्ष्य केले आहे.

नागरिकांना अत्यावश्यक कामासाठीही घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. गेल्या दोन वर्षापासून पावसाळ्यात शहरात होत असलेल्या या त्रासामुळे वैतागलेले नागरिक सोशल मिडियावर नगरपालिकेला लक्ष्य करत आहेत. नगरपालिकेच्या कारभारावर उपहास आणि टिकेचा भडीमार होत आहे. भुयारी गटर योजना बंद पडल्यामुळे नजिकच्या काळात तरी या त्रासातून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शहरातील बहुतांश भागात भुयारी गटर योजनेचे पाईप टाकण्यासाठी रस्ते मधोमध खोदण्यात आले आहेत. त्यापैकी बाजारपेठेतील रस्त्यांचेच फक्त घाईघाईत डांबरीकरण करण्यात आले आहे. बाकीचे रस्ते मात्र तसेच सोडून देण्यात आले आहेत. बाजारपेठेतील व्यापार्‍यांनी खराब रस्त्यामुळे आमच्या व्यवसायांवर परिणाम होतो, म्हणून लवकर रस्ते नीट करा, असा गलका केला. परिणामी त्यांचे रस्ते लगेच तयार झाले.

शहराच्या चोहोबाजूने विस्तारलेल्या वस्तीतील हजारो नागरिक मात्र तसे सोशिक आहेत. ते बिचारे रस्ते उखडून ठेवले काय किंवा  बंद केले काय, सोसतच राहतात. त्यामुळे नगरपालिकेला त्यांच्या समस्यांची दखल घ्यावीशी वाटत नाही. परिणामी दोन वर्षे झाली, त्यांचे रस्ते तसेच ओबडधोबड, उखडलेले राहिले आहेत. खेादकाम झालेल्या भागाने रस्त्यांची पार रया घालविलेली आहे. केवळ मुख्य रस्तेच नव्हे तर गल्लीबोळातील रस्त्यांचीही वाट लागलेली आहे. खोदलेला भाग बुजवितानाही नीट काळजी घेतली गेली नाही. त्यामध्ये मातीयुक्त मुरुमाचा वापर करण्यात आला आहे. भर टाकताना नीट दबाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्त्यांची लेव्हलच राहिलेली नाही. खोलगट भागात चाके रुतुन वाहने फसत आहेत.

पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांवर होणार्‍या सततच्या वाहतुकीमुळे धुराळा उडून नागरिक खूप त्रस्त झाले होते. आता पावसाळ्यात या रस्त्यावर सर्वत्र चिखल साठला आहे. या चिखलातून चालणे तसेच दुचाकी चालविणे जिकिरीचे झाले आहे. विशेषत: लहान मुले, महिला, वृध्दांना चिखलमय रस्त्यातून मार्ग काढणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावर घसरगुंडी तयार झाली आहे. त्यातून पादचारी आणि दुचाकीस्वार घसरुन पडत आहेत. खूप त्रास झाल्यानंतर काही नागरिक आपला संताप सोशल मिडियावर नगरपालिकेवर टिकेचा भडीमार टाकणार्‍या पोस्ट टाकून व्यक्त करत आहेत. मात्र नगरपालिकेला अजूनही जाग आलेली नाही.

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #बार्शी #शहर #रस्तेचिखलात #नगरपालिका #लक्ष्य
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर ग्रामीणमध्ये 281 नवीन बाधित तर सहाजणांचा मृत्यू
Next Article करमाळा नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सोलापूर जिल्ह्यात प्रथम

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?