Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘हॉट’ बार्शीत ओपन चलेंजचा नवा ‘जलवा रे जलवा’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

‘हॉट’ बार्शीत ओपन चलेंजचा नवा ‘जलवा रे जलवा’

Surajya Digital
Last updated: 2022/09/18 at 9:27 AM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
》आरोपांची नॉनस्टाप एक्सप्रेस■ बार्शीतील उद्योग-व्यवसाय वाढीला दिले नाही प्रोत्साहन■ या शहरातील २२ दाळ मील बंद पडण्याला निष्क्रीय नेतृत्व कारणीभूत■ बाजार समित्यांमधील सेस केवळ २ ते ४ कोटींपर्यंत■ बिचाऱ्या शेतकऱ्यांचे २१ कोटी रूपये बुडविण्याला कारणीभूतस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● चढाईत राऊतांची सरशी, सोपलांची गोची● उद्योगाची अगली मंझिल● राऊतांचा डब्बल उखळी बॉम्ब

》आरोपांची नॉनस्टाप एक्सप्रेस

■ बार्शीतील उद्योग-व्यवसाय वाढीला दिले नाही प्रोत्साहन

■ या शहरातील २२ दाळ मील बंद पडण्याला निष्क्रीय नेतृत्व कारणीभूत

■ बाजार समित्यांमधील सेस केवळ २ ते ४ कोटींपर्यंत

■ बिचाऱ्या शेतकऱ्यांचे २१ कोटी रूपये बुडविण्याला कारणीभूत

सोलापूर / शिवाजी भोसले : ‘बार्शी तिथं सरशी’ अशी प्रत्येक आघाड्यांवर गत असलेल्या या तालुक्यातला राजकीय जलवा तसा उभ्या महाराष्ट्राला परिचित. पण नेहमीच राजकीय गरमी असलेल्या हॉट बार्शीत आता वेगळंचं ओपन चलेंज दिलं गेलंय. ‘Hot’ Barshi Open Challenge Nava ‘Jalwa Re Jalwa’ , Rajendra Raut Dilip Sopal Rajkaran

 

भाजपाचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत आणि माजी आमदार दिलीप सोपल यांच्यातील राजकारणाचा जलवा, कडवी झुंज ही प्रसिध्द एकमेकांना पुरुन उरलेल्या राऊत आणि सोपल या दोघांनी आजवर या तालुक्याच्या राजकारणात एकमेकांना कडवं आव्हान दिलेला इतिहास आहे. पण नेहमीच राजकीय गरमी असलेल्या हॉट बार्शीत आता वेगळंचं ओपन चलेंज दिलं गेलंय. विशेषत्वे, हे चलेंज दिलंय, ते आमदार राजेंद्र राऊत यांनी. चलेंज देताना राऊतांनी वापरलेले जे शब्द प्रयोग आहेत, ते अक्षरश: जहरी आहेत. यापूर्वी आव्हान देताना त्यांनी बहुधा हे शब्द प्रयोग वापरले नसावेत. कडव्या संघर्षाचा ठासून साठा भरलेल्या राऊतांच्या भात्यातून जे बाण निघालेत, ते आग ही आग असे काही औरच.

 

संजय राऊत यांनी दिलेल्या नव्या आव्हानांचा सोपलांनी स्वीकार केल्यास बार्शी तालुक्यातील बिचाऱ्या शेतकऱ्यांचं कल्याण होवू शकतं. आजवर राजकीय पटलावरील राऊतांचं प्रत्येक तगडं आव्हान स्विकारणारे आनंदयात्री सोपल हे आव्हान आनंदाने स्विकारणार का ? राऊतांनी सोडलेले आव्हानांची ‘आग ही आग’ बाण परतवून लावतील का? या संदर्भातील औत्सुक्य आता या तालुक्यात सर्वच पक्षातील संबंधितांना, त्याशिवाय राऊत -सोपल समर्थकांना आहे.

आव्हान स्विकारण्यावरून बार्शीत म्हणे आता काही जणांच्या पैजाही लागल्याची चर्चा आहे. राऊत परिवार करत असलेला कोणताही व्यवसाय सोपल परिवारांनं करून दाखवावा, हेच ते राऊतांनी दिलेले ओपन चलेंज, सोपल परिवारानं आव्हान स्विकारून, समजा या परिवारानं व्यवसाय केले, त्यात जेवढा भाव सोपल देतील, त्यापेक्षा ५० रूपयांनी राऊत यांचा भाव जादा असेल. आव्हान स्विकारून व्यावसाय करताना, शेतकऱ्यांचा फायदा आम्ही बघू, फायदा – तोट्याचा विचार करणार नाही, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

● चढाईत राऊतांची सरशी, सोपलांची गोची

 

सोपल अन राऊत हे कट्टर राजकीय दुष्मन. राजकीय दुष्मनीतून एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या या दोघांनी एकमेकांना खिंडीत तसेच बोळीत गाठण्याची एकही संधी सोडली नाही. यामध्ये कधी सोपल तर कधी राऊतांची सरशी झाली. मात्र कारखाना प्रकरणाशी संबंध असलेल्या २१ कोटी रूपये शेतकऱ्यांना देण्यात प्रकरणात सोपलांवर चढाई करताना राऊत उजवे ठरल्याचं मानण्यात येतंय.

कारण २१ कोटी रूपये १५ दिवसांत जिल्हाधिकारी यांच्याकडे भरावे लागणार आहेत. एक रकमी तब्बल २१ कोटी भरणं म्हणजे दिवसा चांदण्या दिसण्यासारखं भव्य आहे. यातून सोपल हे खिंडीत सापडले गेलेत असं मानण्यात येतय.

● उद्योगाची अगली मंझिल

बार्शी शहरातील उद्योग व्यवसायासंदर्भात सोपल यांच्यावर चौफेर जहरी टिकेचे बाण सोडताना आमदार राजेंद्र – राऊत यांनी राऊत परिवाराच्या सगळ्याच उद्योग धंद्यांची कुंडली सांगतानाच जामगाव या ठिकाणी आपले सुपुत्र प्रकल्प उभारणार आहेत, याशिवाय दाळ मिल प्रकल्पदेखील सुरु होत आहे, हे सांगितले. त्याशिवाय आपले दोन मित्र प्रकल्प साकारात आहेत. त्यांना आपण सहकार्य करीत आहोत हेदेखील ते म्हणाले.

● राऊतांचा डब्बल उखळी बॉम्ब

 

घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांचे २१ कोटी रूपये बुडविण्याच्या मुद्यांवरून राऊत हे सोपल यांची जंत्री काढत आहे. या परिवाराने कोणाच्या जागा आणि जमिनी कशा बळावल्या हे नावासह सांगत आहेत, शेतकऱ्यांचे २१ कोटी द्यावेत, सोपल परिवाराने एक रूपयादेखील कोणाचा बुडवू नये, आपण कोणाचा एक छदाम कधी बुडवला नाही.

बँकेचे खाते कधी थकबाकीत जावू दिले नाही. विट भट्टीसाठी पाच लाख कर्ज काढण्यापासून कर्ज घेण्याला सुरुवात केली. सगळी कर्जे व्यवस्थित भरली जात आहेत. सोपलांनी आपल्यासारखे उद्योग काढावेत, त्यांना पत्रकारांमार्फत आपलं ओपन चलेंज आहे. राऊतसोबत आव्हान स्विकारून यावं पटांगणात राऊतांशी खेळ खेळायला, असा इशाराही त्यांनी आव्हान देताना दिला आहे. इतकेच काय सोपल परिवारातील नशाबाजी संदर्भातदेखील राऊतांनी पंचनामा केला.

 

 

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का ?

गेले त्यांचा विचार करू नका, पुन्हा कामाला लागा, शरद पवार

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

TAGGED: #Hot #Barshi #OpenChallenge #Nava #JalwaReJalwa, #RajendraRaut #DilipSopal #Rajkaran #political, #हॉट #बार्शी #ओपनचलेंज #नवा #जलवारेजलवा #राजकारण #दिलीपसोपल #राजेंद्रराऊत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तीन वर्षानंतर ‘आदिनाथ’चे धुराडे पेटणार; शिखर बँकेने दिला संचालकाकडे ताबा
Next Article जोमात आलेली ‘राष्ट्रवादी’ सत्तांतरानंतर गेली ‘कोमात’

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?