Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बार्शीत मुलानेच केला आईचा खून, झाला मुंबईला पसार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

बार्शीत मुलानेच केला आईचा खून, झाला मुंबईला पसार

Surajya Digital
Last updated: 2021/10/13 at 3:01 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

बार्शी – पैशाच्या वादातून पोटच्या मुलाने जन्मदात्या आईचा डोक्यात दगड घालून खून करून तिचा मृतदेह प्लॅस्टीकमध्ये गुंडाळून घराजवळील झुडपात टाकून दिला. हि घटना वाणी प्लॉट भागात घडली आहे. खून केल्यानंतर मुलगा मुंबईला पळून गेला आहे.

रुक्मिणी नागनाथ फावडे (वय 45 रा. वाणी बार्शी) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. श्रीराम नागनाथ फावडे (वय 21) असे खून केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मुलाविरोधात बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मुलाचे घरात पैशावरुन नेहमी वाद होत होते. मृत महीला रुक्मिणी व तिचा मोठा मुलगा श्रीराम हे दोघेजण घरात नेहमी भांडण होत असल्याने वेगळे राहत होते.

आई रुक्मिणी व मोठा मुलगा श्रीराम हे दोघेजण वाणी प्लॉट मधील विवेक शिंदे यांच्या घरात राहत होते. या दोघा मायलेकरात पैशावरून वाद होत असे.
याबाबत मागे एकदा पोलीसातही तक्रार दाखल होती. या वादातून मुलगा श्रीराम याने आईच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो प्लॅस्टीमध्ये गुंडाळून घराजवळील झुडपात टाकला. काल मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. खूनानंतर मुलगा मुंबईला पळून गेल्याच स्पष्ट झालं आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचा मोठा मुलगा श्रीराम हा सध्या मुंबई येथे गेल्याचे त्याच्या मोबाईल स्टेटस वरुन समजले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच घरातील सर्व वापरण्याचे कपडे त्याने नेल्याचे लक्षात आले. यापूर्वीही त्याने आईस व भावास मारहाण केली होती. त्यामुळे त्यानेच आईचा डोक्यात दगड घालून जिवे ठार मारले, असा संशय आहे. पोलिस पुढिल तपास करत आहेत.

* महिलेच तोंड दाबून आळजापूरात जबरी चोरी

बार्शी – मध्यरात्री घरात घुसलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या तोंडाला रुमाल लावून गळ्यातील दिड तोळ्याचे सोन्याचे गंठण, घरात कपाटात ठेवलेली ५० हजाराची रोकड व दागिने असा १ लाख ४ हजाराचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

हि घटना बार्शी तालुक्यातील आळजापूर गावात काल मध्यरात्री घडली. प्रविण एकनाथ उंबरे यांनी याबाबत पोलीसात फिर्याद दिली आहे. उंबरे यांच्या घरात दोन चोरटे तोंडाला मास्क लावून घुसले. घरात शिरताच त्यांनी फिर्यादी उंबरे यांच्या पत्नी राधा यांच्या तोंडात रुमाल घालून

त्यांना धरुन त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र काढून घेतलं व दमदाटी करुन कपाटातील रोकड व दागिने असा १ लाख ४ हजाराचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. वैराग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

* परंडा रस्त्यावरील गांधी स्टॉपजवळ गुटखा विक्री करणार्‍यास पकडले
बार्शी : परंडा रस्त्यावरील गांधी स्टॉप जवळ विक्री करण्यासाठी गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जवळ बाळगणार्‍या दिनेश जीवन गवळी (रा. परंडा रस्ता, बार्शी) यास शहर पोलिसांच्या पथकाने पकडले. त्याच्याविरोधात अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा प्रमोद सुरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहर पोलिसांचे पथक गस्त घालत असताना त्यांना गुटखा विक्रीबाबत माहिती मिळाली. त्यावरुन त्यांनी गांधी स्टॉपजवळ दिनेश गवळी याची तपासणी केली असता त्याच्याजवळ प्रतिबंधित  राजनिवास, बादशहा, आरएमडी मसाला आदी गुटखा व सुगंधित तंबाखूची पाकिटे मिळून आली. त्याची एकूण किंमत 7, 450 रुपया होती. याप्रकरणी त्यास ताब्यात घेवून  त्याच्याविरोधात अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Mother #killed #bychild #Barshi #passed #Mumbai, #बार्शी #मुला #आई #खून #मुंबई #पसार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भिशीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश
Next Article ‘महात्मा गांधींना हटवून सावरकरांना राष्ट्रपिता करतील’, सावरकरांनी ब्रिटिशांकडे केली होती दया याचिका

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?