बार्शी : बार्शी तालुक्यातील वैराग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विना परवाना बसवल्याप्रकरणी पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये संघर्ष झाल्यामुळे तणाव पसरला आहे. यावेळी पोलिस ठाण्याला घेराव घालणाऱ्या ग्रामस्थांवर लाठीमार झाल्यामुळे लोक संतप्त झाले आहेत.

वैराग येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री बसविण्यात आला आहे. यासाठी परवानगी घेतली गेली नसल्यामुळे ही बाब निदर्शनाला आल्यानंतर पोलिसांनी सर्वपक्षीय नेतेमंडळींना पोलिस ठाण्यात पाचारण केले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माजी जि. प. सभापती मकरंद निंबाळकर, माजी ता. पं. सदस्य निरंजन भुमकर, माजी सरपंच संतोष निंबाळकर, उपसरपंच संजय भुमकर यांची याप्रकरणी चौकशी सुरु झाल्यानंतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने ठाण्याकडे गेले. यावेळी जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे मोठा गोंधळ झाला. यामध्ये काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकाराने संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावरच ठिय्या मांडुन आंदोलन सुरू केले आहे.
