Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: beaten by sand contractor सोलापुरातील वाळू ठेकेदाराकडून मोहोळमधील शेतक-याला मारहाण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

beaten by sand contractor सोलापुरातील वाळू ठेकेदाराकडून मोहोळमधील शेतक-याला मारहाण

Surajya Digital
Last updated: 2022/05/01 at 8:33 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

सोलापूर : मोहोळ तालुक्यात वाळू ठेकेदाराची सध्या मनमानी चालू आहे. नदी पात्रात मोटारीचा पाइप जोडण्यास गेलेल्या शेतक-यास ठेकेदाराने मारहाण केली. या घटनेमुळे बेगमपूर परिसरातील नदीकाठ काठालगतचे शेतकरी प्रचंड धास्तावले आहेत. Farmer in Mohol beaten by sand contractor in Solapur

मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथील शेतकरी विनोद विश्वनाथ पाटील यांना भीमा नदी पात्रात मोटारीचा पाइप जोडत असताना मारहाण केली. या घटनेची कामती पोलिसात नोंद झाली आहे.

विनोद विश्वनाथ पाटील यांची भीमा नदी काठावर शेती आहे. शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी विनोद विश्वनाथ पाटील हे त्यांचे सहकारी भास्कर पांडुरंग पाटील, दीपक औदुंबर पाटील, अभिषेक आप्पासाहेब पाटील (सर्व रा. बेगमपूर) यांना घेऊन शेतातील विद्युत मोटारीचा पाइप जोडण्यासाठी गेले होते.

 

हे सर्वजण पाईप जोडत असताना वाळू ठेकेदार नागेश ताकमोगे (रा. सोलापूर), दत्तात्रय गणपत चव्हाण (रा.बेगमपूर), महावीर कदम (रा.बार्शी) व इतर ५० ते ६० अनोळखी व्यक्ती तेथे आले. त्यातील दत्तात्रय चव्हाण यांनी आम्ही येथील वाळूचा ठेका घेतला आहे. तुमचा नदीत यायचा काही संबंध नाही, अशी धमकी दिली.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/531609701850097/

 

यावर आम्ही मोटारीचा पाईप जोडण्यासाठी आलो आहोत, असे सांगत असताना त्यांनी शिवीगाळ करून हातातील काठ्यांनी मारहाण करून आम्हाला जखमी केले. हे भांडण सोडवण्यासाठी केशव बाबासाहेब पाटील आले असता त्यांनाही धक्काबुक्की करून त्याचे मोटार सायकलची तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी विनोद पाटील यांनी कामती पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

□ अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

 

सोलापूर : कोणीतरी अज्ञात इसमाने एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला कशाचीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याची घटना दि.२८ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सोलापुरात घडली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यावरून अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलगी ही तिच्या आजीच्या घरी देवाचा कार्यक्रम आहे असे सांगून घरातून गेली होती. त्यावेळी बराच वेळ झाल्यानंतर ती तरुणी परतली नसल्याने तिच्या आईने शेजार्‍यांकडे व आपल्या नातेवाईकांकडे विचारपूस करून माझी मुलगी आली आहे का असे विचारून चौकशी केली.

मात्र ती कोठेही मिळून न आल्याने पीडित मुलीच्या आईची खात्री झाली कि, कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या मुलीला कशाचीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली. पुढील तपास सहाय्यक फौजदार चव्हाण करीत आहेत.

https://www.facebook.com/109399567404448/posts/531704138507320/

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Farmer #Mohol #beaten #sand #contractor #Solapur, #सोलापूर #वाळू #ठेकेदार #मोहोळ #शेतकरी #मारहाण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Prema Kiran अभिनेत्री प्रेमा किरण यांचे निधन, राष्ट्रवादीत केला होता प्रवेश
Next Article मशिदीवरील भोंग्यांना केले पुन्हा टार्गेट, सभेवेळी अजान सुरू, राज ठाकरे संतापले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?