मुंबई : ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे कौतुकही होत आहे आणि या चित्रपटावरून वादही सुरू आहे. आत त्यातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ‘बेळगाव फाईल्स’ संदर्भात एक व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. आणि ‘बेळगाव फाईल्स’ काय कमी भयानक आहेत? अशा प्रकारचा सवाल करणारे हे व्यंगचित्र आहे. तसेच भाषिक गळचेपी, लोकशाहीचा खून आणि मराठी तरूण असे मुद्दे उपस्थित करणारे हे व्यंगचित्र आहे.
‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा भाजपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. पंतप्रधान स्वत: त्या चित्रपटाचे प्रचारक आहेत, अशी खोचक टीका राऊतांनी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राऊत यांनी एक कार्टून ट्वीट करत बेळगावचा मुद्दा उपस्थित केलाय.
संजय राऊत यांनी ‘बेळगाव फाईल्स’ असं कॅप्शन देत एक कार्टून ट्वीट केलंय. जगदीश कुंटे यांच्या कार्टूनमध्ये बेळगावात मराठी माणसावर कशाप्रकारे अन्याय होतो. त्यात भाषिक गळचेपी, लोकशाहीची हत्या आणि मराठी तरुणांना दहशतीच्या वातावरणात ठेवण्याचे होणारे प्रयत्न दाखवण्यात आले आहेत. ‘… आणि ‘बेळगाव फाईल्स’ काय कमी भयानक आहेत?’, असा खोचक सवाल विचारण्यात आलाय.
कर्नाटक सरकारकडून बेळगावमधील मराठी माणसावर अन्याय होत असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. शिवसेना सुरुवातीपासून हा मुद्दा मांडत आली आहे. तसंच शिवसेनेकडून बेळगावमधील प्रश्नावर सातत्यानं आंदोलनही करण्यात येतं. याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी हे ट्वीट करत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. What makes The Kashmir Files and Belgaum Files less awful? Sanjay Raut cartoon
https://twitter.com/rautsanjay61/status/1505165379060252674?t=6P450W5llWBxcJJuuDnnGg&s=19
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
याच पार्श्वभूमीवर ‘बेळगाव फाइल्स’ असे नाव देत व्यंगचित्र ट्विट करत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. ‘.. आणि बेळगाव फाईल्स काय कमी भयानक आहेत.?’ असा प्रश्न त्यानी केला असून चित्राच्या खाली ही ‘लोकशाहीचा खून’ असं कॅप्शन दिलं आहे. ली आहे. चित्राच्या खाली ही ‘लोकशाहीचा खून’ असं कॅप्शन आहे.
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरुन संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. हा सिनेमा भाजपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय. पंतप्रधान स्वत: त्या चित्रपटाचे प्रचारक आहेत, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. त्याचबरोबर ’32 वर्षापूर्वीचा आक्रोश, इतिहास, वेदना त्या पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचं कौतुक केलं पाहिजे.
या सिनेमात अनेक सत्य दडपली आहेत. ताश्कंद फाईल हा सिनेमा त्याच निर्मात्याकडून प्रसिद्ध झाला आणि लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचं खापर एका कुटुंबावर फोडण्यात आलं. हा एक राजकीय अजेंडा या माध्यमातून राबवला जात आहे’, अशी टीका संजय यांनी केली.
दरम्यान, आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची ऑफर औरंगाबादमध्ये एमआयएमनं दिलीय, पण ‘औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्यांसोबत कोणत्याही प्रकारची युती शक्य नाही’ असं म्हणत शिवसेना ही ऑफर धुडकावून लावत असल्याचे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.