सोलापूर : गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळेची घंटा अखेर आजपासून वाजली आहे. सोलापुरात जिल्हा परिषदेच्या आजपासून भरली आहे. गेल्या दोन शैक्षणिक वर्षात बंद असलेल्या जिल्हा परिषदेच्या 83 शाळा आजपासून सुरु झाल्या. शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1414511571418554369?s=19
मात्र माळशिरस तालुक्यात एक महिन्यापासून कोरोना रुग्ण नसलेली आठ गावे आहेत. मात्र या गावात आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळा नसल्याने आज माळशिरस तालुक्यात एकाही शाळेची घंटा वाजली नाही.
सोलापुरात जिल्ह्यात 1 हजार 024 पैकी 678 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. यातील 335 गावात शाळा सुरु करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. यानुसार कोरोनामुक्त असलेल्या 678 गावातील 83 जिल्हा परिषदेच्या शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने कोरोनामुक्त असलेल्या गावात आठवी ते बारावीच्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्यातील शाळा सुरू करण्याचा पहिला निर्णय सोलापूरमध्ये घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी सोलापुरात झालेल्या प्रशासनाच्या आढावा बैठकीत शाळा सुरु करण्याबाबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घोषणा केली होती.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1414540716039102465?s=19
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज 12 जुलै सोमवारपासून 8 वी ते 12 वीपर्यंतचे सर्व वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये कोरोना आटोक्यात आला आशा 335 गावांमध्ये शाळेची घंटा वाजली आहे. शाळा सुरू करत असताना कोरोना नियमांचे पालन करण्यात आले. तसेच शिक्षण विभाग याबाबत योग्य ती खबरदारी घेईल, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या आहेत.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1414447911618768897?s=19
आज माळशिरस तालुक्यात शाळेची घंटा वाजली नाही. या तालुक्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा 95 आहेत. आठवीचे वर्ग असलेल्या जिल्हा परिषदेच्या 17 शाळा आहेत. तालुक्यातील वाफेगाव, बिजवडी, वटफळी, तांबेवाडी, माळेवाडी, बोरगाव, विठ्ठलवाडी, निटवेवाडी, शेंडेवाडी ही गावे एक महिनाभरापासून कोविडमुक्त आहेत. वाफेगाव वगळता उर्वरित सात गावांत माध्यमिक तसेच आठवीचा वर्ग असलेली जिल्हा परिषदेची एकही शाळा नाही.
वाफेगावमध्ये माध्यमिक शाळा, वाफेगाव – बाभूळगाव नावाची विनाअनुदानित शाळा या दोन्ही गावांच्या शाळा या दोन्ही गावांच्या हद्दीवर आहे. या शाळेचा 42 पट आहे. दोन्ही गावांतील प्रत्येकी 20 ते 22 मुले या शाळेत आहेत. वाफेगावमध्ये सध्या कोरोना रुग्ण नाहीत, पण बाभूळगावमध्ये आहेत. त्यामुळे ही शाळा सुरू होऊ शकली नाही.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1414141256330932228?s=19