नवी दिल्ली, 10 जून (हिं.स.)। रॉयल
चॅलेजर्स बंगळुरुच्या विजयी मिरवणुकीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा दुर्देवी
मृत्यू झाला होता.या घटनेनंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मालक
फ्रँचायझीचा काही भाग किंवा सर्वच हिस्सा विकण्याचा विचार करत आहेत. RCB सध्या ब्रिटिश डिस्टिलरी डियाजियो पीएलसीच्या
मालकीची आहे.
आरसीबीच्या संघात सर्वाधिक भागीदारी असलेल्या
डियाजियोने फ्रँचायझीचे संभाव्य मूल्यांकन आणि बाजारपेठेतील त्याचे आकर्षण
मूल्यांकन करण्यासाठी गुंतवणूक बँका आणि आर्थिक सल्लागारांशी संपर्क साधल्याची चर्चा
आहे. यानुसार अहवालात दावा केला जात आहे की, संघाची मालकी सुमारे १७हजार कोटी
रुपयांना हस्तांतरित केली जाईल अशी चर्चा आहे.
या संदर्भात डियाजियो अथवा आरसीबीकडून कोणतेही
अधिकृत विधान आलेले नाही. कंपनीच्या प्रवक्त्याने यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.
तर आरसीबी व्यवस्थापनानेही कोणत्याही प्रश्नांना उत्तर दिले नाही. आता, डियाजियो आरसीबीमधील
आपला हिस्सा खरच विकणार का ? आणि जर हा हिस्सा विकला तर संभाव्य
खरेदीदार कोण असणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असेल.