भंडारा, 4 एप्रिल (हिं.स.)।
लाखांदूर तालुक्यातील खैरी येथील शेतकऱ्यावर हल्ला करत वाघाने ठार केल्याची घटना घडली होती त्यामुळे गावकरी आक्रमक होत लाखांदूर येथील वन विभागाच्या कार्यालयावर धडकले होते.खैरी येथील डाकराम देशमुख हा शेतकरी हा शेतात मका पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता. त्या दरम्यान शेतकरी रात्र होऊन देखिल परतला नव्हता.घरच्या लोकांनी व गावकऱ्यांनी शोधाशोध केलं पण शेतकरी मिळाला नव्हता.
शेतात त्याचा मृतदेह आढळून आला.वाघाने त्याला ठार करत शिकार केली होती शेतकऱ्याच्या मृत्युने गावात भीतीचे वातावरण पसरले होते गावकऱ्यांनी लाखांदूर येथील वन विभागाच्या कार्यालयावर आपला मोर्चा वळवत वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली असतांना आज अखेर नारभक्षी वाघाला पकडण्यात तीन दिवसानंतर वनविभागाला यश आले आहे.