Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ८ डिसेंबरच्या भारत बंदला अनेक पक्षांचा पाठिंबा, मोदी सरकारची कोंडी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशशिवार

८ डिसेंबरच्या भारत बंदला अनेक पक्षांचा पाठिंबा, मोदी सरकारची कोंडी

Surajya Digital
Last updated: 2020/12/06 at 6:38 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ८ डिसेंबर रोजीच्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) या पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज ११ वा दिवस आहे.

कृषी कायद्याच्या विरोधात कडाक्याच्या थंडीचा विचार न करता पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडून आहेत. विरोधी पक्षांनी ‘भारत बंद’ला पाठिंबा जाहीर केला असताना दुसरीकडे शेतकरी संघटनांच्या नेत्यांचीही बैठक सुरू आहे. आंदोलनाबाबतची पुढची रणनिती ठरविण्यासाठी शेतकरी संघटनांचे नेते चर्चा करत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. “आम्ही आंदोलनाच्या समर्थनार्थ पक्षाच्या कार्यालयात प्रदर्शन करू. यामुळे राहुल गांधी यांचे शेतकऱ्यांसाठीचे समर्थन अधिक बळकट होईल”, असं पवन खेडा म्हणाले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएसचे अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांनीही ‘भारत बंद’ला पाठिंबा जाहीर केला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनेही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे आणि भारत बंदमध्ये पक्ष पूर्ण सहकार्य करेल, असे तृणमूलचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, भारत बंदला अनेक पक्षांनी पाठिंबा जाहीर केल्याने मोदी सरकारसमोर आता मोठी कोंडी निर्माण झाली आहे.

You Might Also Like

पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा

न्यायाबरोबर निसर्गाचे रक्षण देखील सामाजिक जबाबदारी – सत्र न्यायाधीश अंजू शेंडे

इराणने मोसादशी संबंध असलेल्या तीन गुप्तहेरांना दिली फाशी, ७०० जणांना अटक

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी

विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार

TAGGED: #८डिसेंबरच्या #भारतबंदला #अनेकपक्षांचा #पाठिंबा #मोदीसरकारची #कोंडी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गेल्याच आठवड्यात लग्न झालेल्या घरास आग; लाखोचे नुकसान
Next Article केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरुद्ध शरद पवार थेट राष्ट्रपतींना भेटणार; सरसकट विरोध नाही

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?