अहिल्यानगर, 15 मार्च (हिं.स.)।
पुरुष घराच छत असेल तर महिला खांब आहे. संसाररूपी रथाच्या दोन चाकापैकी एक चाक महिला आहे.आयुष्याच युद्ध खेळताना पुरुष दांडपट्टा असेल तर महिला समशेर आहे.अशा महिलांच्या कर्तुत्वावर स्तुतीसुमने उधळत दुर्गा तांबे यांनी हसत खेळत सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयातील प्राध्यापिका आणि विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन केले.आपल्या भाषणात पुढे त्यांनी महिलांनो आपले कर्तव्य कधीच विसरू नका, मात्र वय विसरून स्वच्छंदीपणे जगत जीवनाचा मनमुराद आनंद लुटायला कधीच विसरू नका असा मोलाचा सल्ला दिला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब वाघ यांनी महिलांना त्यांच्या हक्काची व संवैधानिक कायद्याची माहिती व्हावी म्हणून लोक शाही चे गाईड ही पुस्तिका भेट दिली. आपल्या स्वागतपर भाषणात प्राचार्यांनी विद्यार्थिनींना आणि प्राध्यापिकांना स्व-संरक्षणार्थ सज्ज होण्यासाठी कायद्याची पुस्तिका हीच आधाराची काठी म्हणून देत आहोत, असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एकविरा फाउंडेशन आयोजित मुलींच्या रस्सीखेच व क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकावला त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.