Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरातील रेल्वे उड्डाणपूलाचा मार्ग झाला मोकळा; सोलापूर – मंगळवेढा चौपदीकरणाला येणार वेग
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापुरातील रेल्वे उड्डाणपूलाचा मार्ग झाला मोकळा; सोलापूर – मंगळवेढा चौपदीकरणाला येणार वेग

Surajya Digital
Last updated: 2020/07/22 at 7:08 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर-मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात खूप दिवसांपासून अडथळा ठरलेल्या भैय्या चौकातील रेल्वे उड्डाण पुलाच्या प्रश्न आता मार्गी लागला आहे. महापालिका आयुक्तांनी पाठपुरावा केल्याने हा प्रलंबित भय्या  चौकाच्या पूलाचा मार्ग मोकळा झाला आहे.

भय्या चौकातील  उड्डाणपुलाचे आयुष्य संपुष्टात आल्याचे रेल्वे विभागाने यापूर्वीच महापालिकेला कळवले आहे. हा पूल तोडून त्याजागी दोन लेनचे दोन नवीन पूल उड्डाणपूल उभारण्याचे प्रस्तावित आहे. आता दहा महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे.  महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाने उड्डाण पुलाच्या पोहोच रस्त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या जमिनीचा आगावू ताबा दिल्यामुळे या उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होईल,  अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली.

भय्या चौकातील या रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाचे प्रस्ताव मंजूर आहेत. मात्र पोहोच रस्त्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या जमिनीचा ताबा न मिळाल्याने हे काम प्रलंबित होते. सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी याबाबत राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाकडे पाठपुरावा केला.  त्यांनी वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव के. गोविंदराज यांच्याशी याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे चर्चा केली. त्यानंतर के. गोविंदराज यांनी एनजी मिलच्या ताब्यातील सिटी सर्व्हे क्रमांक  8467 आणि  8468 या दोन गटातील 5 हजार 675 चौरस मीटर जागा पोहोच मार्गाचे काम करण्यासाठी द्यावी, अशा सूचना त्यांनी वस्त्रोद्योग महामंडळाला दिल्या.

याबदल्यात महापालिका वस्त्रोद्योग महामंडळाला टिडीआर देणार आहे. याबाबतची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी त्यांना सांगितले.
या उड्डाणपुलाचे आयुष्य संपुष्टात आल्याचे रेल्वे विभागाने यापूर्वीच महापालिकेला कळवले आहे. त्यावेळी हा पूल तोडून त्याजागी दोन लेनचे दोन नवीन पूल उड्डाणपूल उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. सोलापूर-मंगळवेढा महामार्गाच्या कामास सुरवात झाली आहे. या दोन पुलाचे काम लवकरच सुरू करून येत्या दहा महिन्यात पूर्ण केले जाईल, असे संजय कदम यांनी सांगितले.

याकामासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरून पाठपुरावा केला होता. उड्डाण पुलाच्या पोहोच रस्त्यासाठी आवश्‍यक असणारी जागा महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात आहे. ती जागा महापालिकेच्या ताब्यात दिली जाईल. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केली जाणार होती. इतक्‍या प्रक्रियेला विलंब लागला असता. हा विलंब टाळण्यासाठी जमिनीचा आगावू ताबा देण्यात आला आहे, असे श्री. कदम यांनी सांगितले.

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #भय्याचौक #रेल्वेपूल #महापालिकाआयुक्त #पाठपुरावा #सैलापूर-मंगळवेढा #रेल्वेपूल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article तापसीचे कंगनाला प्रत्युत्तर; स्वार्थासाठी एखाद्याच्या मृत्यूचा फायदा नाही उचलू शकत
Next Article सोलापूर शहरात कोरोनाबाधित रुग्ण चार हजाराच्यावर; नव्याने चार मृत्यू तर 64 रुग्ण

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?