Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोठी गुडन्यूज – महाराष्ट्रात मान्सून दाखल, पाऊस बरसणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

मोठी गुडन्यूज – महाराष्ट्रात मान्सून दाखल, पाऊस बरसणार

Surajya Digital
Last updated: 2021/06/05 at 4:15 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

मुंबई : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात आज मान्सून दाखल झाला आहे. हवामान विभागाने ही माहिती दिली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात मान्सून दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र 2 दिवस आधीच मान्सून दक्षिण कोकणातील हर्णेपर्यंत व दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंत दाखल झाला आहे. यंदा मान्सूनमध्ये राज्यात चांगला पाऊस होणार, असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला आहे.

कोरोनाविरुद्धचे 'युद्ध' जिंकणार, धारावीत फक्त 'एक' रुग्ण आढळला https://t.co/S6ExPcDITZ

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021

अखेर केरळात नैऋत्य मोसमी वार्‍याचे आगमन झाले आहे. केरळातील विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. केरळात मॉन्सून दाखल झाल्यानंतर काही तासांतच नैऋत्य मोसमी वार्‍यांनी कर्नाटकच्या दिशेने आगेकूच केली आहे. पुढील दोन-तीन दिवसांत मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ठाणे, रायगड, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी कबुतरं आणि मांजरांना नष्ट करण्याचे आदेश https://t.co/XHwgURhYZf

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021

नांदेड जिल्ह्यात आज सकाळी मॉन्सूनपूर्व मुसळधार पाऊस बरसला. पावसाची तीव्रता एवढी होती, की नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेला हळद आणि इतर शेती उत्पन्न माल अक्षरशः पावसात भिजला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे रिकामे गाळे असताना ते शेतकर्‍यांना उपलब्ध करून न दिल्यामुळे वर्षभर राबराब राबणार्‍या शेतकर्‍यांच्या घामाचे उत्पन्न मातीमोल ठरले. त्याचप्रमाणे बाजार समितीतील शेतकर्‍यांचा आलेला माल ठेवण्यासाठी उभारण्यात आलेले गाळे, काही व्यापार्‍यांनी अनधिकृतपणे ताब्यात घेऊन त्यांचे गोदाम बनवल्यामुळे शेतकर्‍यांना माल उघड्यावर टाकावा लागत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

एकीकडे राज्यात नैऋत्य मोसमी वार्‍याच्या आगमनासाठी पोषक हवामान तयार होत असताना, मागील काही दिवसांपासून राज्यात पूर्व मोसमी पावसाने जोर धरला आहे. पुढील 24 तासांत केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुद्दुचेरी, दक्षिण कर्नाटकमध्ये मॉन्सून दाखल होईल. यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात 48 तासांत पाऊस पडणार अशी भविष्यवाणी वेधशाळेने केली. भारतात चौदा हवामान केंद्रे आहेत. यापैकी साठ टक्के हवामान केंद्राच्या कार्यक्षेत्रात दोन दिवसांत अडीच मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडला आहे, असे वेधशाळेने सांगितले.

मोदी सरकार आणि ट्विटरमध्ये पुन्हा नवा संघर्ष पेटण्याची शक्यता https://t.co/NsL5kTPyCv

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021

अरबी समुद्रातील स्थिती बघता 48 ते 72 तासांत मुंबईसह महाराष्ट्रात पाऊस पडेल, असा अंदाज मुंबई वेधशाळेचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी व्यक्त केला. उन्हाने त्रासलेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळेल. शेतीच्या पुढील नियोजनासाठी पहिला पाऊस वेळेवर पडणे आवश्यक आहे. यामुळे शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. त्यांनाही पावसाने हजेरी लावल्याने दिलासा मिळेल.

मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा येऊन शहरांमध्ये नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी ग्रामीण भागात नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच या पावसाने काही ठिकाणी शेतकर्‍यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पिंपरी चिंचवड शहरात तुफान पावसाने हजेरी लावली. शहरात सकाळपासूनच ढग दाटून आले होते. हलक्या सरीही कोसळत होत्या; पण दुपारी तीन नंतर मात्र पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शहरवासीयांची चांगलीच तारांबळ उडाली.

महाविकास आघाडीचा गोंधळ संपला! मध्यरात्री निघाले आदेश; पाच टप्प्यात हटणार लॉकडाऊनचे निर्बंध
https://t.co/iSVF3cgOZW

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021

* या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’

केरळमधील पठानमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, कोझीकोड, कन्नूर आणि कासरगोड आठ जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातही मॉन्सून दाखल झाला आहे. दक्षिणेतील वार्‍याच्या चक्रीय गतीमुळे मागील आठवड्यात नैऋत्य मोसमी वार्‍यांच्या वेग श्रीलंकेच्या परिसरात मंदावला होता; पण त्यानंतर आता मोसमी वार्‍यांनी वेग घेतला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्सून अरबी समुद्रातील काही भागासह गोवा आणि महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

* नाशिकसह विविध भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

नाशिक जिल्ह्यात आज अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील काही भागात तीन वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतात पाणी साचले होते. कालसुद्धा तालुक्यातील काही भागात पाऊस झाल्याने कांद्यासह अन्य पिकांना त्याचा फटका बसला. धुळे जिल्हातील साक्री तालुक्यामध्ये तब्बल एक तास वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. साक्री तालुक्यातील बहुतांश ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे बर्‍याच घरांवरील पत्रे उडून गेल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. तासभर चाललेल्या अवकाळी पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शेतास तळ्याचे स्वरूप आल्याचे बघावयास मिळाले आहे.

भारतातील सर्वात खराब भाषा कोणती? उत्तरामुळे गुगलने मागितली माफी; गुगलविरोधात कन्नड भाषिक आक्रमकhttps://t.co/iUdD99llNA

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 4, 2021

गडचिरोली शहरात मॉन्सूनपूर्व रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. वाढत्या उन्हाच्या उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहरातील वातावरण थंड झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली आहे. चिपळूण, खेड, दापोलीमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाचा जोर वाढला आहे. पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा आला आहे तर बळीराजा सुखावला आहे. नांदेड जिल्ह्यात आज सकाळी मॉन्सूनपूर्व पाऊस मुसळधार झाला. नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेली शेतकर्‍यांची हळद आणि इतर शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले.

I Love rain mansoon pic.twitter.com/6rTbnERGfn

— Sanjna nisad (@TyagiSanjna) June 5, 2021

You Might Also Like

नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

TAGGED: #Biggoodnews #Monsoon #begins #Maharashtra #willrain, #मोठीगुडन्यूज #महाराष्ट्रात #मान्सूनदाखल #पाऊस #बरसणार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोदी सरकार आणि ट्विटरमध्ये पुन्हा नवा संघर्ष पेटण्याची शक्यता
Next Article शेतात पडला ३०० फूट खोल प्रचंड मोठा खड्डा

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?