नवी दिल्ली : एन. व्ही. रमन्ना यांची सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रमन्ना यांच्या नावाची शिफारस केली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रमन्ना यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब केले. 24 एप्रिल 2021 पासून रमन्ना हे सरन्यायाधीश म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. मुख्य न्यायाधीश शरद बोबडे 23 एप्रिलला निवृत्त होत आहेत.
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यायाधीश एन. व्ही. रामन्ना यांची देशाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. पदभार स्विकारताच एन. व्ही. रामन्ना हे देशाचे ४८ वे सरन्यायाधीश ठरणार आहे.
https://twitter.com/ANI/status/1379303743183806467?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1379303743183806467%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
देशाचे मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांनीच पुढील सरन्यायाधीश पदासाठी न्यायाधीश एन. व्ही. रामन्ना यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यांच्या शिफारसीनंतर राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यालयाकडून आता नियुक्त करण्यात येत असल्याचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सरन्यायाधीश शरद बोबडे हे येत्या 23 एप्रिलला निवृत्त होणार असून त्यांनी पुढच्या सरन्यायाधीश पदासाठी न्यायाधीश एन व्ही रामन्ना यांचं नाव सुचवलं होतं.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1379377704320008195?s=19
एन. व्ही. रामन्ना यांचा जन्म 27 ऑगस्ट 1957 साली आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात झाला. एन. व्ही. रामन्ना हे देशाचे सर्वोच्च न्यायाधीश म्हणून 26 ऑगस्ट 2022 पर्यंत काम पाहणार आहेत. जवळपास चार दशकांच्या न्यायव्यवस्थेच्या कार्यकाळात एन. व्ही. रामन्ना यांनी आंध्र प्रदेश, केंद्र आणि आंध्र प्रदेश प्रशासकीय न्यायाधिकरण उच्च न्यायालयाबरोबर इतरही महत्त्वाच्या ठिकाणी उत्तम कामगिरी बजावली आहे.
* कोण आहेत सरन्यायाधिश एन व्ही रमना?
– सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधिशपदी नियुक्ती झालेले एन व्ही रमना यांचं पूर्ण नाव नथापलपती वेंकट रमना असे आहे.
– त्यांचा जन्म आंध्रप्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला.
– 1983 रोजी त्यांनी वकील म्हणून या क्षेत्रात पहिले पाऊल टाकले होते.
– याआधी दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणूनदेखील काम पाहिले.