कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात मोठा उलटफेर झाला आहे. आधी या ठिकाणी ममता बॅनर्जी विजयी झाल्याचे वृत्त होते. मात्र आता ममतांचा 1600 मतांनी पराभव झाल्याचा दावा केला जात आहे. या ठिकाणी भाजपचे शुभेंदू अधिकारी हे जिंकल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे अमित मालवीय, राकेश सिन्हा यांनीही याविषयी ट्विट केले आहे.
https://twitter.com/ANI/status/1388848705734729738?s=20
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये आपला गड राखत भाजपला धूळ चारली आहे. पण, नंदीग्राम मतदारसंघातून ममतादीदींना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सुरुवातीला ममतादीदी जिंकल्या असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण, नंतर भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी विजयी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1388801140465102849?s=20
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. तृणमूल काँग्रेसने एकहाती सत्ता राखत 218 जागांवर आघाडीवर आहे. अद्यापही मतमोजणी सुरू आहे. तृणमूल काँग्रेसने 148 जागांवर विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवली.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1388732516429754369?s=20
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांच्या विरोधात भाजपकडून शुभेंदू अधिकारी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मतमोजणीच्या सुरुवातीपासून अधिकारी हे आघाडीवर होते. पण संध्याकाळी अचानक चित्र पालटले आणि ममतादीदींनी आघाडी घेतली. 1200 मतांनी ममतादीदींना विजयी घोषित करण्यात आले होते. ममतादीदी विजयी झाल्यामुळे सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते.
Don't worry about Nandigram, I struggled for Nandigram because I fought a movement. It's ok. Let the Nandigram people give whatever verdict they want, I accept that. I don't mind. We won more than 221 seats & BJP has lost the election: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/jmp098PF2A
— ANI (@ANI) May 2, 2021
* ममतादीदींनी पराभव स्वीकारला
पण अंतिम निकालाअंती चित्रच पालटले. शुभेंदू अधिकारी हे 1622 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आले आहे. ममतादीदींच्या पराभवामुळे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. खुद्द ममता बॅनर्जी यांनी पराभव स्वीकारला आहे. ममता बॅनर्जींना पुन्हा मुख्यमंत्री होता येईल, पण पुढच्या सहा महिन्यात त्यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल, त्यासाठी टीएमसीच्या एका आमदाराला राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण बंगालमध्ये विधानपरिषद नसल्यामुळे विधानपरिषदेतून ममतादीदींना आमदार होता येणार नाही.
शरद पवार, संजय राऊत यांनी केले ममता दीदींचे अभिनंदन, नंदीग्राममधून ममता बॅनर्जी 3 हजार 372 मतांनी आघाडीवर
https://t.co/9IcNpFx2ZL
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021
* शपथविधीचा कार्यक्रम छोटेखानी
या विजयी घोडदौडीनंतर ममता बॅनर्जी यांनी म्हटलं, “हा बंगालच्या लोकांचा, भारतातल्या लोकांचा आणि लोकशाहीचा विजय आहे.” भाजपचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांनी घाणेरडं राजकारण केलं, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं. कोरोनाची स्थिती बघता शपथविधीचा कार्यक्रम छोटेखानी केला जाईल, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं. ममता बॅनर्जी यांच्या या विजयामुळे देशातील इतर राज्यांमधील नेत्यांनी अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे.
पंढरपूरचा निकाल : राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव, भाजपचा 3716 मतांनी विजय, 'शिवसेना, राष्ट्रवादीला दुसऱ्याच्या लग्नात नाचण्याची 'सवय' https://t.co/Zg9PRZSlmi
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021