Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अभिनेते शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा निवडून आलेल्या मतदारसंघात पुत्राचा पराभव
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा निवडून आलेल्या मतदारसंघात पुत्राचा पराभव

Surajya Digital
Last updated: 2020/11/10 at 8:14 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहेत. बिहार निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र, तर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा भाऊ लव सिन्हा याला पराभवाचा धक्का बसला आहे.

बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या नितीन नवीन यांनी लवला ‘खामोश’ केले. बांकीपूर विधानसभा मतदारसंघात नितीन नवीन हे सलग चौथ्यांदा आमदार झाले आहेत.

त्यांनी 33 हजारांपेक्षा जास्त मतं मिळवत विजय मिळवला. एकूण मतांपैकी 61 टक्क्यांपेक्षा अधिक मतं नवीन यांना मिळाली. जवळपास 18 हजारांच्या मताधिक्याने ते विजयी झाले. काँग्रेस उमेदवार लव सिन्हा हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 15 हजारांच्या आसपास मतं त्यांच्या पारड्यात पडली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बांकीपूर विधानसभा मतदारसंघ हा पटना साहिब लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. या मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा भाजपच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढले, मात्र भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी सिन्हांना पराभवाची धूळ चारली होती.

* लंडनहून आलेल्या चौधरीचा पराभव

विशेष म्हणजे स्वतःला मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार घोषित करणाऱ्या पुष्पम प्रिया चौधरी बांकीपूरमधूनही रिंगणात उतरल्या होत्या. मात्र त्यांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. अवघी 1991 मतं मिळवत त्या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या आहेत. चौधरी या निवडणूक लढवण्यासाठी लंडनहून आल्या होत्या. बांकीपूरमधून एकूण 22 उमेदवार नशीब आजमावत होते.

You Might Also Like

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा

युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा

अंतराळ स्थानकाहून शुक्लांचा हिंदी भाषेतून संदेश

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

TAGGED: #अभिनेतेशत्रुघ्नसिन्हा #दोनवेळानिवडून #बांकीपूरमतदारसंघात #पुत्रलवसिन्हाचा #पराभव
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्री पदाच्या दावेदार ब्लॅकलेडीला धक्का; नोटांपेक्षाही कमी मते
Next Article राज्यपालांचा फोन, अर्णबला नातेवाईकांना भेटू द्या; गृहमंत्री देशमुख, शरद पवार काय म्हणाले ?

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?