Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मारुती चितमपल्ली यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार जाहीर; इतर जणांचाही पुरस्कार जाहीर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

मारुती चितमपल्ली यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार जाहीर; इतर जणांचाही पुरस्कार जाहीर

Surajya Digital
Last updated: 2020/11/05 at 9:24 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षीचा पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार सोलापूरचे मारुती चितमपल्ली यांना जाहीर झाला आहे. इतर पुरस्कारांमध्ये पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कारतांदलवाडी जि. जळगाव येथील उदय सुभाष चौधरी यांना तर पक्षी संशोधन पुरस्कार डॉ. अमोल सुरेश रावणकर अचलपूर व किरण मोरे, अमरावतीयांना विभागून देण्यात आला आहे. पक्षी जनजागृती पुरस्कार नाशिक येथील सतीश गोगटे यांना जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली असून पक्षिमित्रजीवन गौरव पुरस्कार, पक्षिमित्रपक्षी संवर्धन-सुश्रुषा पुरस्कार व पक्षी संशोधन पुरस्कार व पक्षीजनजागृती पुरस्कार असे चार पुरस्कार दरवर्षी देण्यात येत असतात. या पुरस्कारांचे वितरण पुढील 34 व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार आहे.

यावर्षीचा रमेश लाडखेडकर पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कारहा दीर्घकाळ पक्षिमित्र चळवळीत राहून, पक्षी संवर्धन व जनजागृती यासाठी कार्यरत पक्षिमित्र चळवळीतील मार्गदर्शक, जेष्ठ सभासद, तथा पर्यावरण लेखक मारुती चितमपल्ली यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून या वर्षी हा पुरस्कार विदर्भ पक्षिमित्र मंच द्वारे डॉ. अनिल पिंपळापुरे यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे. दुसरा पुरस्कार डॉ. जी. एन. वानखेडे स्मृती पक्षीमित्र पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कारहा पक्षिमित्र चळवळीतील पक्षी संवर्धन, अधिवास संवर्धन तथा जखमी पक्षी उपचार आदी क्षेत्रात कार्यरत पक्षिमित्र सभासद, तथा चातक संस्थेसोबत कार्यरत असलेले पक्षिमित्र उदय सुभाष चौधरी जि. जळगाव यांना जाहीर करण्यात आला आहे.रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कारस्व. डॉ. जी. एन. वानखेडे मेमोरिअल फंड तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यावर्षीचा तिसरा पुरस्कार डॉ. व्ही. सी. आंबेडकर स्मृती पक्षिमित्रपक्षी संशोधन पुरस्कार हा पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास, संशोधन, प्रकाशने आणि जनजागृती आदी क्षेत्रात कार्यरत संशोधन क्षेत्रात कार्यरत सभासद डॉ . अमोल सुरेश रावणकर अचलपूर व किरण मोरे, अमरावती यांना विभागून देण्यात आला आहे.

रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वर्षी हा पुरस्कार वाईल्डलाइफ हेरीटेज कन्झर्वेशन सोसायटी नाशिक तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे. चौथा पुरस्कार ईश्वरदयाल गौतम स्मृती पक्षिमित्र पक्षीजनजागृती पुरस्कार हा पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास आणि जनजागृती आणि नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभ्यास आदी क्षेत्रात कार्यरत सभासदनाशिक येथील सतीश गोगटे यांना जाहीर करण्यात आला आहे. रोख रक्कम, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून यावर्षी हा पुरस्कार नेस्ट संस्था (NEST), पालघर, व्दारा सचिन मेन यांचे तर्फेप्रायोजित करण्यात आलेला आहे.

या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार असून यावर्षी ३४ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन सोलापूर येथे २०२१ मध्ये होणार असून या पुरस्कारांचे वितरण या संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी कळविली आहे.

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

TAGGED: #मारुतीचितमपल्ली #पक्षीमित्र #जीवनगौरव #पुरस्कार #इतरजणांचे #जाहीर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article नियमांचे काटेकोर पालन करून नाट्यप्रयोग करा; मराठी रंगभूमी दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली परवानगी
Next Article अमेरिकेत हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता; ५० हून अधिकजणांना अटक

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?