Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात मौज वाटते – शिवसेना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात मौज वाटते – शिवसेना

Surajya Digital
Last updated: 2020/11/05 at 10:32 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना काल बुधवारी एका जुन्या आत्मसत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची आवई भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील लोकांनी उठवली आहे. त्यांच्या जोडीला दिल्ली सरकारमधील अनुभवी शहाणेही सामील व्हावेत हे आश्चर्यच आहे, असं म्हणत शिवसेनेनं विरोधकांवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राच्या भाजपवाल्यांनी अन्वय नाईक यांना न्याय मिळावा म्हणून वाद घालायला हवा. ते मराठी मातीचे पुत्र आहेत. पण भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात अलीकडे मौज वाटू लागली आहे. मराठी माणूस मेला तरी चालेल, पण सवतीच्या पोरास सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे असे त्यांचे धोरण स्पष्ट आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर टीका केली आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून विरोधकांवर हल्लाबोल केला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* अटकेशी राजकारणाशी, पत्रकारितेशी संबंध नाही.

कधीकाळी ‘काँग्रेस’ गवत हे अगदी निरुपयोगी उत्पादन म्हटले जात असे. ते केवळ निरुपयोगीच नव्हे तर चांगलेच उपद्रवी असल्याचे मत तेव्हाच्या राजकीय विरोधकांकडून व्यक्त केले जात होते. त्याच गवताचा काढा करून सध्याचे भाजपवाले दिवसातून दोन वेळा पीत असावेत असे त्यांचे वर्तन आहे. मुंबईतील एका वृत्तवाहिनीचा मालक, संपादक असलेल्या अर्णब गोस्वामी यास एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली. त्याच्या अटकेचा राजकारणाशी, पत्रकारितेशी संबंध नाही.

* फडणवीस सरकारने प्रकरण दाबले

गोस्वामी यांनी टिळक -आगरकरांप्रमाणे सरकारविरोधात जहाल लिखाण केले. त्यामुळे सरकारने त्यांची गचांडी पकडली, असे काही हे प्रकरण नाही. दोन वर्षांपूर्वी अलिबाग निवासी अन्वय नाईक व त्यांच्या आईच्या आत्महत्येशी संबंधित ही अटक आहे. नाईक यांनी मृत्यूपूर्वी जे पत्र लिहिलं त्यात गोस्वामी यांच्याशी झालेल्या आर्थिक व्यवहाराचा, फसवणुकीचा संदर्भ आहे. त्याच तणावातून नाईक व त्यांच्या आईने आत्महत्या केली. पण आधीच्या सरकारने गोस्वामी यांना वाचवण्यासाठी हे सर्व प्रकरण दडपले. त्यासाठी पोलीस व न्यायालयावर दबाव आणला. आपल्या पतीच्या मृत्यूची नव्याने चौकशी करावी, असा अर्ज नाईक यांच्या पत्नीने पोलीस व न्यायालयासमोर केल्यावर कायद्याने जे व्हायचे तेच झाले आहे. गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता चौकशीत काय ते सत्य बाहेर येईल.

* पत्रकारांचे मुडदे पाडले; तेव्हा आणीबाणीची आठवण झाली नाही

गोस्वामी यांनी महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर प्रमुख नेत्यांच्याबाबत गरळ ओकली म्हणून त्यास अटक झालेली नाही. त्याचा संबंध एका मृत्यू प्रकरणाशी जोडला आहे व मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून ही कारवाई आहे. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केल्याप्रमाणे ही अटक म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला वगैरे अजिबात नाही. गुजरातमध्ये सरकारविरोधी लिहिणा-या संपादकांना अटका झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात पत्रकारांचे मुडदे पाडले गेले तेव्हा कोणाला आणीबाणीची आठवण का झाली नाही? महाराष्ट्राच्या भाजपवाल्यांनी अन्वय नाईक यांना न्याय मिळावा म्हणून वाद घालायला हवा.

* नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा!

कायद्याने पंतप्रधान इंदिराजी, नरसिंह राव यांनाही सोडले नाही. अनेक मंत्र्यांना गजाआड जावे लागले. कायद्याच्या कारवाईला सामोरे जाऊन अमित शहादेखील तावून सुलाखून बाहेर पडले आहेत. मोदी यांनी बिहारात कालच श्रीरामाच्या जयजयकाराच्या घोषणा केल्या. अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन केले. सीतेवर आरोप होताच श्रीरामानेही सीतेवर अग्निपरीक्षेची वेळ आणली. ते तर रामराज्य होते. सीतेची अग्निपरीक्षा म्हणजे आजच्या बेगडी रामभक्तांना आणीबाणी किंवा श्रीरामाची हुकूमशाही वाटली काय? एका निरपराध माणसाची आत्महत्या त्यांच्या वृद्ध आईसह झाली. त्यांची पत्नी न्यायासाठी आक्रोश करीत आहे. पोलिसांनी कायद्याचे पालन केले. यात चौथा स्तंभ कोसळला असे सांगणारे लोकशाहीतील पहिल्या स्तंभास उखडू पाहत आहेत. एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा! तरच महाराष्ट्रात कायद्याची बूज राहील.

You Might Also Like

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर वाहतूक कोंडी

संजय राऊत राहुल गांधींचे पगारी नोकर बनले – नवनाथ बन

तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी – विजय वडेट्टीवार

नवनीत राणांचा पाकिस्तानवर हल्लाबोल

TAGGED: #शिवसेना #भाजप #सवतीची #पोरं #मांडीवर #खेळवणे #मौज
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सावधान ! गुगल क्रोमा लवकर अपडेट करुन घ्या, अन्यथा नुकसान
Next Article राज्यात आजपासून जलतरण तलाव, चित्रपटगृहे चालू होणार, मंदिर प्रवेशासाठी प्रतीक्षा

Latest News

सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
देश - विदेश August 18, 2025
‘द बंगाल फाइल्स’वरून विवेक अग्निहोत्रींविरुद्ध नवा एफआयआर
देश - विदेश August 18, 2025
त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण
महाराष्ट्र August 18, 2025
सोलापुरात डीजेमुक्त गणेश मंडळांना विशेष बक्षीस
सोलापूर August 18, 2025
शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष; महाडीबीटी पोर्टलमुळे लाभार्थी वंचित
सोलापूर August 18, 2025
सोलापुरात जिल्हा परिषदेची दोन एकरांची फाईल गायब
सोलापूर August 18, 2025
बिहारचा औंठा-सिमारिया ६ पदरी पूल पूर्ण; २२ ऑगस्टला पंतप्रधान करतील उद्घाटन
देश - विदेश August 18, 2025
वंदे भारतला जोडणार चार डबे; ३१२ प्रवाशांना अतिरिक्त सुविधा
सोलापूर August 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?