Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तुमची हिंमत असेल तर तुम्ही एकएकटे लढा, शिवसेनेलाही टोला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

तुमची हिंमत असेल तर तुम्ही एकएकटे लढा, शिवसेनेलाही टोला

Surajya Digital
Last updated: 2020/12/04 at 6:55 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : नागपूर, पुणे, औरंगाबाद याासाख्या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. या पराभवानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आव्हान दिले आहे. तुमची हिंमत असेल तर तुम्ही एकएकटे लढा. पण त्यांच्यात ती हिंमत नसल्याचं साफ दिसतंय’, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.


विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराने ६ पैकी ५ जागा जिंकल्या. तर भाजपाला धुळे-नंदुरबारची फक्त एकच जागा मिळाली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

‘या निकालांमध्ये फार आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. तीन पक्ष एकत्र येऊन एकाशी लढल्यावर वेगळं चित्र निर्माण होत नाही. असं असूनही आम्ही चांगला संघर्ष केला आणि निकराचा लढा दिला. या निकालांमध्ये मुद्दा असा की शिवसेनेला काय मिळालं याचा त्यांनी विचार करायला हवा. त्यांची अमरावतीची जागा गेली. याउलट या निकालांमध्ये राष्ट्रवादीचा फायदा झाला.

पुणे पदवीधर, मराठावाडा पदवीधर आणि अप्रत्यक्षरित्या अमरावती शिक्षक मतदार संघात त्यांना विजय मिळवता आला. मी या तिघांना आव्हान देतो की तुमची हिंमत असेल तर तुम्ही एकएकटे लढा. पण त्यांच्यात ती हिंमत नसल्याचं साफ दिसतंय’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

* फडणवीसांचा शिवसेनेला टोला

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेला टोला लगावला. ‘नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचा किमान एकतरी उमेदवार विजयी झाला. पण शिवसेनेच्या हाती मात्र काहीही लागलं नाही. त्यांचा एकही उमेदवार जिंकलेला नाही. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्या शक्तीचा अंदाज आम्हाला आला नाही हे खरं. परंतु या तीन पक्षातील केवळ दोघांनाच या निवडणुकीचा फायदा झाला आणि एका पक्षाला मात्र एकही जागा मिळालेली नाही. ज्यांचा राज्यात मुख्यमंत्री आहे, त्यांच्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही ही गंभीर बाब असून त्यांनी आता याचं आत्मचिंतन करावं’, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #तुमचीहिंमत #असेलतर #तुम्हीएकएकटे #लढा #शिवसेनेलाही #टोला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अक्कलकोट रस्त्यावर ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू, तिघे जखमी
Next Article भारतातील श्रीमंत महिला रोशनी झाल्या एचसीएल टेक्नॉलॉजीजच्या नव्या अध्यक्षा

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?