Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आरक्षण गेले तरी भाजप सोलापुरात ओबीसींना न्याय देणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

आरक्षण गेले तरी भाजप सोलापुरात ओबीसींना न्याय देणार

Surajya Digital
Last updated: 2022/05/06 at 1:05 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

□ भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांचे आश्वासन 

सोलापूर : ओबीसींच्या आरक्षणासह निवडणुका घ्यावेत, अशी आमची पूर्वीपासून मागणी होती. मात्र शिवसेना- कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसींची फसवणूक केली असून पाठीत खंजीर खुपसला आहे. तथापि, आगामी निवडणुकीत आम्ही सामाजिक न्याय डोळ्यासमोर ठेवून ओबीसींसाठी सकारात्मक धोरण समोर ठेवत समाजाला न्याय देऊ, असे भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी म्हटले आहे. Even if reservation goes, BJP will give justice to OBCs in Solapur

देशमुख म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने 4 मार्च 2021 रोजी ओबीसी राजकीय आरक्षण रद्द केले. न्यायालयाने सांगितलेली ट्रिपल टेस्ट पूर्ण करून हे आरक्षण पुन्हा लागू करणे शक्य आहे. महाविकास आघाडी सरकारने त्यानुसार एंपिरिकल डाटा गोळा करुन तिहेरी चाचणी पूर्ण केली असती तर ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा अस्तित्वात आले असते. मात्र हे सरकार केवळ चालढकल करत राहिले व परिणामी ओबीसी समाजाचे कायमचे नुकसान झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता महापालिका निवडणूक होईल.  आम्ही ही  निवडणूक आम्ही ताकदीने लढवणार आहोत. त्यामध्ये भाजपची उमेदवारी देताना  निश्‍चितच ओबीसीसाठी एक फॉर्म्युला तयार केला जाईल. आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. भाजपतर्फे या समाजाला न्याय देण्यात येईल, असे देशमुख  म्हणाले.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

https://www.facebook.com/109399567404448/posts/535040444840356/

 

काही महिन्यांपूर्वी सहा जिल्हा परिषदांच्या ओबीसी आरक्षित जागा रद्द होऊन पोटनिवडणुका झाल्या. त्यात भाजपने त्या खुल्या झालेल्या ओबीसींच्या जागेवर ओबीसींनाच तिकिटे देऊन निवडून आणले होते. तसेच धोरण पालिका निवडणुकीत असणार आहे, असेही देशमुख म्हणाले.

□ भाजपच पुन्हा सत्तेवर येणार
महापालिकेची मुदत संपल्यानंतर सहा महिन्याच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक असते. त्यामुळे आम्ही गेल्या सहा ते सात महिन्यांपासून निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे.  खास करून बुथवरच्या बांधणीला प्राधान्य दिले आहे. एक बुथ आणि 35 कार्यकर्ते अशी रचना आम्ही केली आहे.

विशेष म्हणजे केंद्र आणि राज्यातील वॉररूममधून  प्रत्येक कार्यकर्त्याला फोन करून याची खात्रीही केली आहे. त्यामुळे आमची ग्राऊंडलेव्हलपासून तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे गेल्या वेळेस प्रमाणे यंदाही भाजपच सत्तेवर येणार यात काहीही शंका नाही.

केंद्राने केलेली कामे आणि शहरात झालेली स्मार्ट सिटीची  कामे या जोरावर आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुन्हा बाजी मारू, असे शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी सांगितले.

https://www.facebook.com/109399567404448/posts/534953721515695/

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #reservation #goes #BJP #justice #OBCs #Solapur, #आरक्षण #भाजप #सोलापूर #ओबीसी #न्याय
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article municipal elections नगरपरिषदा निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज; दहा नगरपरिषदांची अंतिम प्रभाग रचना तयार
Next Article college girl killed सोलापूर : कंटेनरची दुचाकीस धडक, कॉलेजयीन तरूणी जागीच ठार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?