Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट; अहवाल राष्ट्रपतींना पाठविण्याची मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट; अहवाल राष्ट्रपतींना पाठविण्याची मागणी

Surajya Digital
Last updated: 2021/03/24 at 1:12 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : राज्यातल्या भाजप नेत्यांचे शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. यावेळी राज्यातील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच गेल्या काही दिवसांतील घटनांकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. १०० कोटींचे वसुली प्रकरण व पोलिस बदल्यातील भ्रष्टाचार प्रकरणी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा आणि तो राष्ट्रपतींना पाठवावा अशी मागणी करण्यात आली.

सचिन वाझे प्रकरण तसेच राज्यात सुरु असलेल्या बदल्यांच्या रॅकेट संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच त्यांना या सर्व प्रकरणात लक्ष घालण्याचे निवेदन शिष्टमंडळाकडून देण्यात आले होते. त्यामुळे येणाऱ्या दिवसात आघाडी सरकारच्या अडचणी आणखी वाढणार असेच चित्र दिसून येत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या शिष्टमंडळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, मंगलप्रसाद लोढा, राधाकृष्ण विखे पाटील आदी नेत्यांचा सहभाग होता.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला NIA ने ताब्यात घेतल्यानंतर अनेक धक्कदायक खुलासे समोर आले होते. त्यात वाझे आणि शिवसेना यांच्यातील संबंधांमुळे सेना एकाकी पडली होती. मात्र माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचल बांगडी करण्यात आल्यानंतर त्यांनी थेट वाझे आणि देशमुख यांच्यातील १०० कोटी हप्ता वसूलीचे प्रकरण समोर आणले होते त्यामुळे सेनाबरोंबर राष्ट्रवादी सुद्धा गोत्यात आली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर या विषयावर कोणतंही मत जाहीरपणे व्यक्त केले नाही. शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही सध्यातरी वाझे प्रकरणावर मौन बाळगले आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #BJPleaders #meet #Governor #Demand #report #President, #भाजप #नेत्यांनी #घेतली #राज्यपालांची #भेट #अहवाल #राष्ट्रपतींना #पाठविण्याची #मागणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या
Next Article अभिनेता आमिर खान याला कोरोनाची लागण

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?