नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या अटकेविरोधात आक्रमक झाला असून नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर भाजप नेते ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी पोस्टर्स लावले आहेत. ‘आणीबाणी 2.0’ असा यावर उल्लेख असून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. तुमचे आणीबाणी 2.0 मध्ये स्वागत असल्याचा मजकूर बग्गा यांनी लावलेल्या पोस्टर्सवर आहे.
याआधीही अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी घणाघाती टीका केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या अटकेविरोधात भारतीय जनता पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेते ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टर्स लावले आहेत. यावर ‘आणीबाणी 2.0’ असा उल्लेख असून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. आणीबाणी 2.0 मध्ये तुमचं स्वागत आहे, असा मजकूर बग्गा यांनी लावलेल्या पोस्टर्सवर आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी याआधीही अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर्मनीचा हुकूमशहा ऍडॉल्फ हिटलरसारखे वागत असल्याचं टीकास्त्र त्यांनी सोडलं होतं. ‘महाराष्ट्रात आणीबाणीसारखी स्थिती असून उद्धव ठाकरे हिटलरसारखे वागत आहेत. शक्य तितक्या लवकर हे सरकार बरखास्त करण्यात यावं,’ असं बग्गा यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकाने अर्णब गोस्वामी यांना अटक केली. अर्णब यांना अलिबागच्या कोर्टात हजर करण्यात आलं. अर्णब गोस्वामी यांना पोलीस पकडून घेऊन जात असताना त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप लावले. अर्णब गोस्वामी म्हणाले की, मला औषधेही घेऊन दिली नाहीत. पोलिसांनी मला मारहाण केली असल्याचा आरोप अर्णब यांनी केला. गोस्वामी यांच्यासह या प्रकरणातील आणखी दोन आरोपींनादेखील १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.