Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजप आमदाराच्या मुलाचा कार अपघातात मृत्यू, एकूण 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

भाजप आमदाराच्या मुलाचा कार अपघातात मृत्यू, एकूण 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2022/01/25 at 8:25 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

भंडारा : देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ मेडिकल विद्यार्थ्यांच्या medical students death कारचा अपघात झाला. वर्ध्यातील भीषण कार अपघातामध्ये भंडारा bhandara जिल्ह्यातील तिरोड्याचे आमदार विजय रहांगदळे  mla vijay Rahangdale यांच्या मुलावरही काळानं घाला घातला आहे. विजय रहांगदळे यांचे सुपुत्र यांचा भीषण कार अपघातात मृत्यू झाला. यामुळे रहांगदळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. एकूण 7 विद्यार्थ्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

रहांगदळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. एकूण सात विद्यार्थ्यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती first information आहे. भाजप आमदार विजय रहांगदळे हे भंडारा जिल्ह्याचे आमदार आहेत. त्यांच्या मुलासह एकूण सात विद्यार्थी या भीषण अपघातात दगावले आहेत. इतर सहा जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. इतर मृत विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहे.

देवळीहून वर्धेला येत असताना सेलसुराजवळ मेडिकल विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात झाला आहे. सेलसुराजवळील नदीच्या पुलावरून कार थेट खाली कोसळली. तब्बल 40 फूट उंचीवरुन विद्यार्थ्यांची कार खाली पडल्याने सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.

BJP MLA’s son killed in car accident, 7 students killed

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

अपघातातील सर्व मृत विद्यार्थ्यांचं वय 25 ते 35 च्या दरम्यान आहे. मध्यरात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, अपघातानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं बचावकार्यास सुरुवात केली आहे.

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात भीषण अपघातांची मालिका सुरु असून आतापर्यंत झालेल्या तीन अपघातात 15 जणांचा गेल्या 48 तासांत मृत्यू झाला आहे. तब्बल चार तास मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. कारमधील एकाचाही या अपघातात जीव वाचू शकलेला नाही. एकूण सात जण या अपघातात मृत्युमुखी पडलेत.

चारचाकी एक्सयुव्ही वाहनावरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचं सांगितलं जातंय. कार नेमकी कोण चालवत होतं, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षा संपल्यामुळे पार्टी करण्यासाठी हे सर्व विद्यार्थी गेले असल्याचं बोललं जातंय. मात्र अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. कार थेट पुलावरुन खाली कोसळल्यानं या अपघातात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #BJP #MLA's #son #killed #car #acciden #students #killed, #भाजप #आमदार #मुलाचा #कार #अपघात #मृत्यू #7विद्यार्थ्यांचामृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article किरीट सोमय्या मंत्रालयात : फाईल्स केल्या चेक, कोणत्या अधिकाराने फाईल्स बघितल्या ?
Next Article नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका, राऊतांच्या ट्विटवर पूनम महाजन भडकल्या

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?