Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजपा केंद्रीय मंत्र्यांच्या जावईची पोलिस कोठडीत रवानगी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारणगुन्हेगारी

भाजपा केंद्रीय मंत्र्यांच्या जावईची पोलिस कोठडीत रवानगी

Surajya Digital
Last updated: 2020/12/17 at 11:11 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना मंगळवारी रात्री पुण्यात अटक करण्यात आली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी एका व्यक्तिला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

अशातच आता हर्षवर्धन जाधव सध्या पोलीस कोठडीची शिक्षा भोगत असताना त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन जाधव अतिशय दयनीय अवस्थेत दिसत आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतील हर्षवर्धन जाधव यांची अवस्था पाहून त्यांना मारहाण झाल्याचं दिसत आहे. तसेच त्यांचा शर्ट देखील फाटला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी न्यायालयात फिर्यादीनेच आपल्याला मारहाण केल्याचा दावा केला आहे.

तसेच आपल्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा आणि अटक ही एक राजकीय डावपेच असल्याचंही जाधव यांनी न्यायलयात म्हटलं आहे. जाधव यांना पुण्यातून अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयाने हर्षवर्धन जाधव यांना 18 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, हर्षवर्धन जाधाव यांनी पुण्यात एका छोट्या अपघाताच्या वादातून दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली होती. यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात अमन चड्डा यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अमन चड्डा यांनी तक्रारीत जाधव यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अमन चड्डा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, पुण्यातील औंध भागातून माझे आई वडील दुचाकीवरून चालले होते. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या गाडीचा अचानक दरवाजा उघडला आणि माझ्या आई वडिलांचा अपघात झाला. या अपघातात आई गंभीर जखमी झाली आहे.

वडिलांचीही नुकतीच एन्जीओप्लास्टी आणि ओपन हार्ट ऑपरेशन झालेले आहे. हर्षवर्धन जाधवांना हे सर्व सांगूनही ते माझ्या वडिलांना छातीवर बुक्क्या व लाथांनी मारहाण करत राहिले आणि त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.

तसेच हर्षवर्धन जाधव यांच्याबरोबर असलेली महिला इशा झा यांनी देखील शिवीगाळ केली आणि माझ्या आई वडिलांना मारहाण केली. माझ्या आईला लाथ मारून तिला ढकलून दिले. यामुळे आईच्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे, असंही अमन चड्डा यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

You Might Also Like

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

उबाठाच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार

TAGGED: #भाजपा #केंद्रीयमंत्र्यांच्या #जावईची #पोलिसकोठडीत #रवानगी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article करन जोहर संकटात, एनसीबीने धाडली नोटीस
Next Article अडचणीतल्या कारखान्याला गतवैभव मिळवून देणार; सरकोलीत सांत्वनपर शरद पवारांची भेट

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?