नवी दिल्ली : इस्लामचे संस्थापक प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत एका टीव्ही चर्चेदरम्यान वादग्रस्त विधान केल्याबद्दल भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित केले. त्यांच्याविरोधात पक्षाने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, दिल्ली भाजपचे मीडिया प्रभारी नवीन कुमार जिंदाल यांनाही पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दरम्यान, कोणत्याही धर्माच्या पूजनीयांचा अपमान भाजपला मान्य नाही, असे पक्षाने म्हटले आहे. Comment on Prophet Mohammad: BJP suspended Nupur Sharma and Jindal
नुपूर शर्मा आणि नविन जिंदल यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. भाजप दिल्लीचे प्रदेश मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनासुद्धा निलंबित करण्यात आले असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. त्यांनी सोशल मीडियावर सांप्रदायिक धार्मिक मुद्द्यावर वादग्रस्त पोस्ट केली आहे. तसेच हे भाजपच्या मूळ विचारांच्याविरोधात आहे. नुपूर शर्मांबाबत जारी केलेल्या पत्रात त्यांनी पार्टीच्या विचारांच्याविरुद्ध विचार व्यक्त केल्यामुळे कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेले वक्तव्य पार्टीच्या संविाधानातील नियम 10 (a)च्या विरुद्ध आहे. पूर्ण प्रकरणाचा तपास होत नाही तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी पार्टीचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह म्हणाले की, भाजप कोणत्याही धर्माच्या व्यक्तींचा अपमान झाल्यास स्वीकार करत नाही. तसेच भाजपला कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या भावना दुखावणारी कोणतीही कल्पना मान्य नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
भाजप मुख्यालयाकडून जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे की, भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्म हा बहरला आणि फूलला आहे. भाजप सर्वच धर्मांचा सन्मान करते. तसेच कोणत्याही धर्माच्या कोणत्याही व्यक्तीचा अपमानाबाबत तीव्र शब्दात निषेध करते. पार्टी अशा विचारांच्या विरोधात आहे. जे धर्माचे आणि समाजाचे अपमान करतात. अशा कोणत्याच विचारधारेचा प्रचार भाजप करत नाही.
तसेच नवीन जिंदल यांच्या निलंबनावर भाजपने जारी केलेल्या पत्रात असे म्हटलं आहे की, “आपण सोशल मीडियावर जातीय सलोखा भडकावणारी मते व्यक्त केली आहेत. हे भारतीय जनता पक्षाच्या मूळ कल्पनेच्या विरोधात आहे.” आपण पक्षाच्या विचार आणि धोरणांच्या विरोधात काम केल्याचे पत्रात पुढे लिहिले आहे. त्यामुळे तुमचे भारतीय जनता पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व तात्काळ संपुष्टात येत असून तुमची पक्षातून निलंबित करण्यात आले असल्याचे पक्षाने जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
या दोघांनाही ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. एका टिव्ही शो मध्ये बोलत असताना भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्यानंतर पक्षाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.