मालेगाव, 10 जून, (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ११ वर्ष पूर्ती निमित्त भाजपा प्रदेश तर्फे –“संकल्प से सिद्धी” या कार्यशाळेच आयोजन जिल्हास्तरीय करण्याचे निर्देश दिल्यानंतर मालेगाव येथील भाजप कार्यालयात ‘संकल्प से सिद्धी’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपचे तीनही विधानसभेतील सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यशाळेत केंद्रात नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचा भार स्वीकारल्या नंतर गेल्या ११ वर्षाच्या काळात सेवा, सुशासन व गरीब कल्याणाच्या बाबतीत ज्या योजना झाल्या त्याची माहिती पुढील काळात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता घरोघरी जाऊन जनतेला देईल. त्याची जनजागृती करेल.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर राष्ट्रवाद जागा झालेला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या कामाचा ठसा देशवासीयांच्या मनावर उमटवला आहे. त्यामुळे त्यांच्या या कामगिरीबद्दल जनमानसात जागर करण्याचे काम ‘संकल्प से सिद्धी’ या माध्यमातून केले जाणार असल्याचे फक्त मी यावेळी सांगितलं. यावेळी संकल्प से सिद्धीच्या राज्यातील उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
‘एक पेड माँ के नाम’ म्हणून पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण करण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या. मोदींच्या काळात ४ कोटी लोकांना पक्की घरे मिळाली. हर घर जल योजना आणली. रस्ते, महाविद्यालये, विद्यापीठे आली. सदर झालेला मोठ्या प्रमाणात विकास याची जनजागृती तळागळात जाने गरजेचे असल्याचे प्रमुख वक्तयांनी आपल्या भाषणात सांगितले.