Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भाजपाचे समाधान आवताडे सात ते बारा फे-यांमध्ये आघाडीवर, पंढरपूर शहरात मुसंडी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

भाजपाचे समाधान आवताडे सात ते बारा फे-यांमध्ये आघाडीवर, पंढरपूर शहरात मुसंडी

Surajya Digital
Last updated: 2021/05/02 at 10:57 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर / पंढरपूर : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीच्या आठव्या फेरीअखेर भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपाचे समाधान आवताडे यांना आठव्या फेरीअखेर 2295 मतांची आघाडी मिळाली आहे. तर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे पिछाडीवर आहेत. सुरुवातीला भालके आघाडीवर होते.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या दहावी फेरीमध्ये भाजपाचे समाधान अवताडे 1838 मतांनी आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. पंढरपुर शहरात भाजपने मुसंडी मारलीय. पंढरपूर शहरात बारावी फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे 1 हजार 400 मतांनी आघाडीवर असल्याचे वृत्त आहे.

पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपाचे समाधान आवताडे यांना 2295 मतांची आघाडी #surajyadigital #पोटनिवडणूक #सुराज्यडिजिटल #Byelection #pandharpur #पंढरपूर #भाजपा #NCP pic.twitter.com/UizMugk1N7

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021

मंगळवेढा संपूर्ण तालुका तर पंढरपूर तालुक्‍यातील 35 गावे आणि पंढरपूर शहर असा पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके महाविकास आघाडीकडून तर भाजपच्या वतीने समाधान आवताडे रिंगणात होते. शिवसेनेकडून उमेदवारी मिळेल ही आशा फोल ठरल्यानंतर शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी बंडखोरी करून या निवडणुकीत उडी घेतली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गोकुळ दूध संघावर कुणाची सत्ता? आज मतदान, मंगळवारी निकाल https://t.co/UNWkC8nCro

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021

या मतदार संघाची एकूण मतदार संख्या तीन लाख 40 हजार 889 एवढी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही या मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री बच्चू कडू, गुलाबराव पाटील यांसह अन्य मंत्र्यांनी वारंवार सभा घेतल्या. तर समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आमदार राम सातपुते, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनीही मतदारसंघ पिंजून काढला.

पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपचे समाधान आवताडे 450 मतांनी पुढे #Byelection #pandharpur #पंढरपूर #surajyadigital #सुराज्यडिजिटल #मंगळवेढा pic.twitter.com/kuRaUAkFUp

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021

या निवडणुकीत एकूण 65.73 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दोन लाख 24 हजार 68 मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये मतदारांनी स्व. भारत भालके यांची आमदारकीची गादी भगीरथ भालके यांच्याकडेच सोपवली की मंगळवेढ्यातील 35 गावच्या पाणी प्रश्‍नासाठी मतदार समाधान आवताडे यांच्या बाजूने उभे राहिले, याचा फैसला आज मतमोजणीतून होत आहे.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक, भाजपच्या मंगला अंगडी आघाडीवर #belgaum #Byelection #बेळगाव #पोटनिवडणूक #भाजपा #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/vG8nUlR6CB

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 2, 2021

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #BJP's #SamadhanAvatade #Language, #भाजपाचे #समाधानआवताडे #आघाडीवर #राष्ट्रवादी #भगिरथभालके
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विरोधी पक्षनेते फडणवीसांविषयी शिवराळ भाषेचा वापर, पाचजणांवर गुन्हा
Next Article तृणमूलला स्पष्ट बहुमत, मात्र नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी 8 हजाराने पिछाडीवर

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?