नागपूर : आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये एकाच झाडावर तीन कोब्रा दिसून येत आहेत. राजेंद्र सेमालकर यांनी हा फोटो काढल्याचे नंदा यांनी सांगितले आहे. ‘आशिर्वाद… जेव्हा तीन कोब्रा आपल्याला एकत्र आशिर्वाद देतात, ‘ असे कॅप्शनही नंदा यांनी दिले आहे. नागपूरजवळच्या मेळघाटच्या जंगलातील हा फोटो असल्याचे सांगितले जात आहे.
सापाचे बरेच व्हिडिओ आणि फोटो आपण पाहिले असतील, साप हा असा प्राणी आहे ज्याला लोक घाबरतात, परंतु आता जे समोर आले आहे ते खूपच आश्चर्यकारक आहे. हा फोटो नेटकरी, युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. खरं तर हा फोटो महाराष्ट्रातील मेळघाटातील जंगलांतील आहे. जिथं एक विस्मयकारक दृश्य पाहायला मिळालं. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये काळ्या रंगाचे तीन नाग झाडाभोवती गुंडाळलेले आशीर्वाद रुपात दिसत आहेत.
जो कोणी हा फोटो पाहत आहे, तो अगदी स्तब्ध झालेला दिसतो आणि हा फोटो पुन्हा पुन्हा पाहतो. फोटो पाहून ज्यांना आश्चर्य वाटल्यावाचुन राहणार नाही. त्यामुळे आता हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, काळ्या रंगाचे कोब्रा एकत्र दिसणं फार दुर्मिळ आहे. आता हा फोटो पोस्ट झाल्यापासून सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहे.
हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हे छायाचित्र सुसंता नंदा IFS ने त्यांच्या ट्विटर पेजवर शेअर केले आहे. फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आशीर्वाद… जेव्हा एकाच वेळी तीन साप तुम्हाला आशीर्वाद देतात.’ यासोबतच त्यांनी फोटोचे क्रेडिट राजेंद्र सेमलकर यांना दिले आहे. हा फोटो व्हायरल होताना हजारो लोकांनी पाहिला आहे, तसेच हजारो लोकांनी फोटोवर कमेंट करताना त्यांच्या प्रतिक्रिया देखील शेअर केल्या आहेत.
https://twitter.com/susantananda3/status/1460623716904099850?t=fslQeOMC9NEfsj2TIrneYg&s=19
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लोकांच्या कमेंट्सबद्दल बोलताना एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘आपल्याला जेवढे वाटते तितके साप हिवाळ्यात हायबरनेट करत नाहीत. हवामान, प्रदेश, हवामान, तापमान, अन्न, वनस्पती इत्यादींवर अवलंबून असते.’ दुसर्या वापरकर्त्याने लिहिले, ‘मला वाटत नाही की हे कोणत्याही प्रकारे आशीर्वाद आहे’ तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘शेअर केल्याबद्दल धन्यवाद. 3 नागांना एकत्र पाहणे सामान्य गोष्ट नाही.’ दुसर्याने लिहिले, ‘हे चित्र खूप सुंदर आहे’ याशिवाय काही लोकांनी या तीन सापांना कुटुंब असल्याचे सांगितले आहे.