पुणे, 4 एप्रिल (हिं.स.)।
लोणावळा- मळवली विभागातील रेल्वे मार्गावर उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी तीन दिवस काही तासांचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे एक्सप्रेस गाड्यांसह लोकलवर त्याचा परिणाम होणार आहे.
येत्या ६ ते ८ एप्रिल रोजी दुपारी दीड ते तीन तासांपर्यंत हा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस पुढीलप्रमाणे रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये एक्सप्रेस गाड्या नियमित करण्यात आल्या असून, लोकल ट्रेन शाॅर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. ते पुढीलप्रमाणे असेल.
ब्लाॅक पहिला :- दि. ६ एप्रिल (दुपारी १.०५ ते ४.०५ वाजेपर्यंत)
– सीएसएमटी-चेन्नई एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक २२१५९) ४ वाजून ५ मिनिटापर्यंत लोणावळा येथे नियमित केली जाईल
– एलटीटी-काकीनाडा एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक १७२२२) कर्जत येथे ३ वाजून २० मिनिटापर्यंत नियमित केली जाईल.
– ग्वाल्हेर- दौंड एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 22194) दहा मिनिटांसाठी नियमित केली जाईल.
– पुणे-लोणावळा ईएमयू आणि शिवाजी नगर-लोणावळा ईएमयूचे शॉर्ट टर्मेशन माळवली येथे केले जाईल.
– लोणावळा-पुणे ईएमयू आणि लोणावळा-शिवाजी नगर ईएमयू मळवलीहून धावेल.
ब्लाॅक दुसरा :- दि. ७ एप्रिल (दुपारी १.०५ ते २.३५ वाजेपर्यंत)
– शिवाजीनगर-लोणावळा ईएमयू माळवली येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.
– लोणावळा-पुणे ईएमयू ही माळवली येथून धावेल.
ब्लाॅक तिसरा :- दि. ८ एप्रिल (दुपारी १.०५ ते ३.०५ वाजेपर्यंत)
– शिवाजी नगर-लोणावळा ईएमयू माळवली येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.
– लोणावळा-पुणे ईएमयू मळवलीहून धावेल.